20 May 2024 5:00 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | 1660 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीला ऑनलाईन गर्दी, पुढेही मालामाल करणार Patel Engineering Share Price | 58 रुपयांचा शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल 37 टक्केपर्यंत परतावा HAL Share Price | तज्ज्ञांचा HAL शेअर्स खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला, बक्कळ कमाई होईल, किती टक्के परतावा मिळेल? NMDC Share Price | PSU NMDC स्टॉकला तज्ज्ञांची 'BUY' रेटिंग, अल्पावधीत मोठी कमाई, किती फायदा होईल? Tata Motors Share Price | तज्ज्ञांकडून टाटा मोटर्स शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राइस जाहीर JP Power Share Price | 19 रुपयाचा शेअर खरेदीला ऑनलाईन गर्दी, यापूर्वी दिला 680% परतावा, संधी सोडू नका Rattan Power Share Price | हा शेअर श्रीमंत बनवणार! प्राईस 13 रुपये, 1 महिन्यात दिला 60% परतावा, खरेदी करा
x

Tata Steel Share Price | टाटा स्टील कंपनीबाबत मोठी अपडेट, शेअरवर काय परिणाम होणार? नेमका काय फायदा?

Tata Steel Share Price

Tata Steel Share Price | आठवड्याच्या शेवटच्या दिवशी (शुक्रवारी) टाटा स्टीलचा खुला भाव 131 रुपये आणि बंद भाव 129.5 रुपये होता. या शेअरचा उच्चांक 134.25 रुपये आणि नीचांकी स्तर 130.65 रुपये होता. बाजार भांडवल 160,742.72 कोटी रुपये होते. 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 133.2 रुपये आणि 52 आठवड्यांचा नीचांकी स्तर 95 रुपये होता. बीएसईचा शेअर 2,577,690 शेअर्सचा होता.

टाटा स्टीलच्या वेल्स प्रकल्पात 1.25 अब्ज पौंड’ची गुंतवणूक

टाटा स्टीलच्या वेल्स येथील पोलाद प्रकल्पात १.२५ अब्ज पौंड’ची गुंतवणूक करण्याची संयुक्त योजना ब्रिटन सरकारने शुक्रवारी जाहीर केली. ब्रिटनच्या सर्वात मोठ्या पोलाद प्रकल्पात काम करणाऱ्या हजारो कर्मचाऱ्यांना दिलासा देण्यासाठी आणि अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी जाहीर करण्यात आलेली ही गुंतवणूक योजना इतिहासातील सर्वात मोठे सरकारी अनुदान मानले जाते. ब्रिटन सरकारकडून निधी न मिळाल्यास कंपनी देशातून व्यवसाय बंद करू शकते, असे संकेत टाटा स्टीलने यापूर्वी दिले होते.

टाटा समूहाची कंपनी टाटा स्टील आणि ब्रिटीश सरकार यांच्यात झालेल्या करारानुसार पोर्ट टॅलबोट स्टील प्लांटमध्ये सरकारी अनुदानासह एकूण सव्वा अब्ज पौंडांची गुंतवणूक केली जाणार आहे. ही गुंतवणूक नवीन विद्युत भट्ट्या उभारणे आणि इतर कमी कार्बन असलेल्या उपक्रमांवर केली जाणार आहे.

काय म्हणाले ब्रिटीश पंतप्रधान?

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या गुंतवणुकीमुळे ब्रिटनच्या पोलाद उद्योगाचे आधुनिकीकरण होईल आणि अधिक स्थिर भविष्य सुनिश्चित होईल. तसेच यामुळे हजारो कुशल कामगारांच्या रोजगाराचे दीर्घकालीन रक्षण होईल आणि अर्थव्यवस्थेच्या वाढीस मदत होईल.

किती कर्मचारी

साऊथ वेल्समधील पोर्ट टॅलबोट येथे असलेल्या या पोलाद प्रकल्पात आठ हजारांहून अधिक कामगार काम करतात. याशिवाय सुमारे १२,५०० लोक पुरवठा साखळीशी संबंधित कामांमध्ये काम करतात. ब्रिटन सरकारच्या डिपार्टमेंट फॉर बिझनेस अँड ट्रेडच्या म्हणण्यानुसार, या प्रस्तावामुळे पाच हजारांहून अधिक लोकांच्या नोकऱ्या मिळण्याची शक्यता आहे.

टाटा स्टील कंपनीने काय म्हटले?

गुंतवणुकीच्या प्रस्तावाची माहिती देताना टाटा स्टीलने सांगितले की, नवीन इलेक्ट्रिक भट्टी कारखान्यातील सध्याच्या कोळशावर चालणाऱ्या भट्ट्यांची जागा घेईल, ज्यामुळे देशातील एकूण कार्बन उत्सर्जन सुमारे दीड टक्क्यांनी कमी होण्याची अपेक्षा आहे. टाटा स्टीलने ब्रिटीश सरकारसोबत केलेला करार हा पोलाद उद्योगाच्या भवितव्यासाठी निर्णायक क्षण असल्याचे सांगून टाटा समूहाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन म्हणाले की, प्रस्तावित गुंतवणुकीमुळे मोठ्या प्रमाणात नोकऱ्या मिळतील आणि दक्षिण वेल्स प्रदेशात हरित तंत्रज्ञान-आधारित औद्योगिक परिसंस्थेच्या विकासासाठी मोठी संधी उपलब्ध होईल.

Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Tata Steel Share Price on 16 September 2023.

हॅशटॅग्स

#Tata Steel Share Price(59)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x