17 May 2024 3:07 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया स्टॉक 'हाय रिस्क' वर, तज्ज्ञांचा Sell करण्याचा सल्ला, किती घसरणार? IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे मार्केटमध्ये धुमाकूळ, संधी सोडू नका Rajnish Retail Share Price | अवघ्या 63 पैशाचा शेअर! 4 वर्षात दिला 14000% परतावा, स्टॉक आजही स्वस्त आणि फायद्याचा Suzlon Share Price | सुझलॉन स्टॉक ब्रेकआऊट लेव्हल अपडेट, शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा सल्ला काय? IREDA Share Price | तज्ज्ञांचा IREDA शेअर्स 'Hold' चा सल्ला, या प्राईसवर मजबूत सपोर्ट, पुढची टार्गेट प्राईस जाहीर HDFC Mutual Fund | अबब! जबरदस्त म्युच्युअल फंड योजना, 10,000 रुपयांच्या SIP वर 9.57 कोटी रुपये परतावा दिला Gold Rate Today | टेन्शन वाढलं! आज सोन्याचा भाव अजून महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
x

Surya Roshni Share Price | प्रत्येक घरात या कंपनीचे प्रोडक्ट्स, शेअर अल्पावधीत मल्टिबॅगर परतावा देतो, स्टॉक स्प्लिट होतोय, फायदा घ्या

Surya Roshni Share Price

Surya Roshni Share Price | सूर्या रोशनी लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. या कंपनीने नुकताच आपले शेअर्स 2 तुकड्यांमध्ये विभाजित करण्याचा निर्णय घेतला होता. आता सूर्या रोशनी कंपनीने आपली स्टॉक स्प्लिटची रेकॉर्ड तारीख जाहीर केली आहे.

बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सूर्या रोशनी कंपनीचे शेअर्स ३.५२ टक्क्यांच्या वाढीसह 1011.55 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज गुरूवार दिनांक 21 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.43 टक्के घसरणीसह 986.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

सूर्य रोशनी स्टॉक स्प्लिट रेकॉर्ड तारीख

सेबीला दिलेल्या माहितीत सूर्या रोशनी कंपनीने कळवले आहे की, कंपनीने आपले 10 रुपये दर्शनी मूल्य असलेले शेअर्स दोन तुकड्यात विभाजित करण्याची घोषणा केली आहे. या स्टॉक स्प्लिटमध्ये शेअर धारकांची पात्रता निश्चित करण्यासाठी कंपनीने रेकॉर्ड तारीख म्हणून 6 ऑक्टोबर 2023 हा दिवस निश्चित केला आहे. म्हणजेच या दिवशी ज्या गुंतवणूकदारांचे नाव कंपनीच्या रेकॉर्ड बुकमध्ये असेल, त्यांना कंपनी स्टॉक स्प्लिटचा लाभ देईल.

बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सूर्या रोशनीचे शेअर्स 990.95 रुपये किमतीवर ओपन झाले होते. आणि काही वेळातच हा स्टॉक 1021.50 रुपये किमतीवर पोहचला. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 1154.90 रुपये होती. सूर्या रोशनी लिमिटेड या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 5503.74 कोटी रुपये आहे.

शेअरची कामगिरी

सूर्य रोशनी कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 400.85 रुपये होती. मागील एका महिन्यात सूर्या रोशनी लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 23 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 52 टक्के नफा कमावून दिला आहे.

मागील एका वर्षात सूर्या रोशनी कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट वाढवले आहे. म्हणजेच या काळात कंपनीच्या शेअर्सनी गुंतवणूकदारांचे पैसे 100 टक्क्यांपेक्षा जास्त वाढवले आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Surya Roshni Share Price today on 21 September 2023

हॅशटॅग्स

Surya Roshni Share Price(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x