
Bonus Shares | ज्या गुंतवणुकदारांना मोफत बोनस शेअर्स वाटप करणाऱ्या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्यात रस आहे, त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. जोंजुआ ओव्हरसीज लिमिटेड ही कंपनी आपल्या शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करणार आहे.
बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केल्यानंतर मागील 6 दिवसांपासून जोंजुआ ओव्हरसीज लिमिटेड कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटमध्ये ट्रेड करत आहे. आज मंगळवार दिनांक 3 ऑक्टोबर 2023 रोजी जोंजुआ ओव्हरसीज लिमिटेड कंपनीचे शेअर्स 4.94 टक्के वाढीसह 16.36 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
बोनस शेअर्स तपशील
जोंजुआ ओव्हरसीज लिमिटेड कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीनुसार, कंपनीने आपल्या शेअर धारकांना 50 शेअर्सवर 9 बोनस शेअर्स मोफत देण्याची घोषणा केली आहे. या कंपनीने बोनस शेअर वाटपसाठी पात्रता निश्चित करण्यासाठी 10 ऑक्टोबर 2023 हा दिवस रेकॉर्ड तारीख म्हणून निश्चित केला आहे. म्हणजेच 9 ऑक्टोबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स एक्स-बोनस स्टॉक म्हणून ट्रेड करतील. ज्या गुंतवणूकदारांकडे रेकॉर्ड तारखेच्या दिवशी 50 शेअर्स असतील, त्यांना कंपनी 9 शेअर्स मोफत देईल.
शेअरची कामगिरी
मागील आठवड्यात शुक्रवारी जोंजुआ ओव्हरसीज लिमिटेड कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या अप्पर सर्किटवर ट्रेड करत होते. आज देखील हा स्टॉक अप्पर सर्किटमध्ये ट्रेड करत आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 31 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 60 टक्के पेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे.
सध्या ही कंपनी सलग तिसऱ्या वर्षी आपल्या शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करत आहे. याआधी कंपनीने 2022 मध्ये 23 शेअर्सवर 4 बोनस शेअर्स वाटप केले होते. आणि 2021 मध्ये देखील कंपनीने बोनस शेअर्स वाटप केले होते. 2022-23 या आर्थिक वर्षात जोंजुआ ओव्हरसीज लिमिटेड कंपनीने 1.18 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.