
IRFC Share Price | मागील काही काळापासून इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन म्हणजेच IRFC कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. अल्पावधीत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे अनेक पट वाढवले आहेत.
मागील सहा महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 176 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज देखील या कंपनीचे शेअर्स जोरदार तेजीत वाढत आहेत. आज मंगळवार दिनांक 3 ऑक्टोबर 2023 रोजी इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन स्टॉक 0.52 टक्के वाढीसह.76.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
आयआरएफसी कंपनीचे शेअर्स वाढवण्याचे विविध कारणे आहेत. कंपनीला मागील काही महिन्यात मोठमोठ्या ऑर्डर मिळाल्या आहेत. आणि भारत सरकारकडून भारतीय रेल्वेच्या पायाभूत सुविधेत केले जाणारे विकास आणि G20 बैठकीत झालेले करार यामुळे इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन स्टॉक मजबूत तेजीत वाढत आहे. सतत तेजीनंतर काही वेळा स्टॉकमध्ये नफा वसुली देखील होते, तसेच या स्टॉकमध्ये झाले आहे. मागील एका आठवड्यात IRFC स्टॉक 0.98 टक्के वाढला आहे.
चालू आर्थिक वर्षाच्या जून 2023 तिमाहीत इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन कंपनीच्या निव्वळ नफ्यात 6 टक्क्यांची घट नोंदवली गेली आहे. एप्रिल ते जून 2023 या कालावधीत IRFC कंपनीने 1557 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. तर कंपनीच्या तिमाही महसुलात 19 टक्के वाढ नोंदवली गेली आहे.
आर्थिक वर्ष 2023-24 तिमाहीत IRFC कंपनीने 6679 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. मागील 6 महिन्यांत इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन स्टॉक 176 टक्के मजबूत झाला आहे. तज्ज्ञांच्या मते इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन स्टॉक पुढील काळात 85 रुपये किंमत स्पर्श करू शकतो.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.