12 May 2024 9:50 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 12 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा रविवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 12 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Power Share Price | तज्ज्ञांनी टाटा पॉवर शेअर्सची रेटिंग घटवली, स्टॉक प्राईसवर मोठा परिणाम होणार Servotech Share Price | मल्टिबॅगर सर्व्होटेक पॉवर सिस्टम्स शेअर्समध्ये घसरण वाढतेय, स्टॉक Hold करावा की Sell? Penny Stocks | चिल्लर प्राईस 10 पेनी शेअर्स खरेदी करा, किंमत 1 रुपया ते 7 रुपये, मोठी कमाई होईल GMP IPO | पहिल्याच दिवशी मालामाल करणारा IPO लाँच होतोय, ग्रे मार्केटमध्ये धुमाकूळ, खरेदी करणार? Tata Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत मोठी अपडेट आली, शेअर्सला किती फायदा होणार?
x

Paytm Share Price | पेटीएम शेअर्सबाबत तज्ज्ञ उत्साही, शेअरची पुढची टार्गेट प्राईस जाहीर, खरेदीचा सल्ला, नेमकं कारण काय?

Paytm Share Price

Paytm Share Price| पेटीएमची मूळ कंपनी असलेल्या One97 Communication कंपनीचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 4 टक्क्यांच्या वाढीसह 936 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 25 ऑगस्ट 2023 रोजी पेटीएम कंपनीचे शेअर्स 939 रुपये या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते.

पेटीएम कंपनीचे एकूण बाजार भांडवल 59,000 कोटी रुपये आहे. मागील तीन आठवड्यात पेटीएम कंपनीचे शेअर्स 10 टक्क्यांपेक्षा जास्त वाढले आहेत. शुक्रवार दिनांक 6 ऑक्टोबर 2023 रोजी पेटीएम स्टॉक 3.33 टक्के वाढीसह 924.95 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.

पेटीएम कंपनीचे शेअर्स 439.60 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवरून 115 टक्के वाढले आहेत. 2022 या वर्षात पेटीएम कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 75 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात पेटीएम कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 35 टक्के परतावा कमावून दिला आहे. पेटीएम कंपनीचे शेअर्स शेअर 2,150 रुपये या आपल्या IPO इश्यू किंमतीच्या तुलनेत 57 टक्क्यांनी खाली ट्रेड करत आहेत.

ब्रोकरेज फर्मच्या मते पेटीएम कंपनीने अद्याप सप्टेंबर 2023 तिमाहीचे निकाल जाहीर केले नाहीये. कंपनीच्या योगदान मार्जिन आणि ऑपरेटिंग लिव्हरेजमध्ये सुधारणा झाल्याने सप्टेंबर 2023 च्या तिमाहीत पेटीएम कंपनीच्या ऑपरेटिंग नफ्यात सुधारणा होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

मोतीलाल ओसवाल फर्मने पेटीएम कंपनीच्या शेअर्सवर 1,000 रुपये लक्ष्य किंमत जाहीर केली आहे. पेटीएम कंपनीचे ऑपरेशन्समधील महसूल वार्षिक 36 टक्क्यांच्या वाढीसह 2,600 कोटी रुपयेपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. तर कंपनीचा नफा 72 टक्क्यांच्या वाढीसह 14,500 कोटी रुपयेवर पोहोचण्याची शक्यता आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Paytm Share Price today on 08 October 2023.

हॅशटॅग्स

#Paytm Share Price(79)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x