
Multibagger Stocks | अफोर्डेबल रोबोटिक कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअरमध्ये पैसे लावून दिग्गज गुंतवणूकदार विजय केडिया यांनी अवघ्या 20 महिन्यांत 8 कोटी रुपये नफा कमावला आहे. गुरुवार दिनांक 5 ऑक्टोबर 2023 रोजी अफोर्डेबल रोबोटिक कंपनीचे शेअर्स 2.26 टक्क्यांच्या वाढीसह 651.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
अफोर्डेबल रोबोटिक ही कंपनी मुख्यतः ऑटोमोटिव्ह उद्योग आणि पार्किंग ऑटोमेशनसाठी टर्न की ऑटोमेशन सोल्यूशन्स सेवा प्रदान करण्याचा व्यवसाय करते. आज सोमवार दिनांक 9 ऑक्टोबर 2023 रोजी अफोर्डेबल रोबोटिक स्टॉक 5.71 टक्के घसरणीसह 645.40 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.
अफोर्डेबल रोबोटिक ही कंपनी मुख्यतः रिअल इस्टेट आणि वाहन उद्योगाच्या ऑटोमेशन संबंधित क्षेत्रात व्यवसाय करते. या कंपनीच्या ग्राहका वर्गात बजाज ऑटो, टाटा मोटर्स, महिंद्रा अँड महिंद्रा, पियाजिओ, कॉस्मा मंगा, लोढा, रुपारेल, एनएल आणि रुद्राक्ष यांसारखे दिग्गज कंपनी सामील आहेत. अफोर्डेबल रोबोटिक कंपनीचे एकूण बाजार भांडवल 663.61 कोटी रुपये आहे.
मागील एका महिन्यात अफोर्डेबल रोबोटिक कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 4.70 टक्के नकारात्मक परतावा दिला आहे. मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअरची किंमत 96.62 टक्के वाढली आहे. 2023 मध्ये अफोर्डेबल रोबोटिक कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 150.88 टक्के नफा कमावून दिला आहे.
मागील एका वर्षात या कंपनीच्या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 337.86 टक्क्यांनी वाढवले आहेत. तर मागील 3 वर्षांच्या कालावधीत अफोर्डेबल रोबोटिक कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 1630 टक्के नफा कमावून दिला आहे.
शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणुकदार विजय केडिया यांनी अफोर्डेबल रोबोटिक स्टॉकमधून प्रचंड नफा कमावला आहे. 20 महिन्यांपूर्वी विजय केडिया यांनी अफोर्डेबल रोबोटिक कंपनीचे 137000 शेअर्स 77 रुपये किमतीवर खरेदी केले होते. या साठी त्यांनी 10,549,000 रुपये गुंतवले होते. आता हा स्टॉक 645 रुपये किमतीवर पोहचला आहे.
अशाप्रकारे विजय केडिया यांनी अवघ्या काही महिन्यात अफोर्डेबल रोबोटिक स्टॉकमधून 89,310,300 रुपये नफा कमावला आहे. जर तुम्ही एक वर्षापूर्वी या कंपनीच्या शेअरमध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 300,983 रुपये झाले असते. 6 ऑक्टोबर 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स 141 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.