
Balu Forge Share Price | बालू फोर्ज इंडस्ट्रीज या स्मॉलकॅप कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पहायला मिळत आहे. मागील 10 महिन्यांत बालू फोर्ज इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सची किंमत 55 रुपयेवरून वाढून 200 रुपयेवर पोहचली आहे. बालू फोर्ज इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सने मागील 10 महिन्यांत आपल्या गुंतवणुकदारांना 289 टक्के परतावा कमावून दिला आहे.
बालू फोर्ज इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरमध्ये सिंगापूर स्थित एका दिग्गज गुंतवणूकदाराने मोठी गुंतवणूक केली आहे. या FII ने बालू फोर्ज इंडस्ट्रीज कंपनीचे 25 लाख शेअर्स खरेदी करून 45 कोटी रुपयेपेक्षा जास्त गुंतवणूक केली आहे. आज मंगळवार दिनांक 10 ऑक्टोबर 2023 रोजी बालू फोर्ज इंडस्ट्रीज स्टॉक 4.86 टक्के वाढीसह 216.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
बालू फोर्ज इंडस्ट्रीज कंपनीने नुकताच आपल्या एक्सचेंज फाइलिंगमध्ये माहिती दिली आहे की, सिंगापूर स्थित फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर Sixteenth Street Asian Gems Fund फर्मने या बालू फोर्ज इंडस्ट्रीज या स्मॉलकॅप कंपनीचे शेअर्स खरेदी केले आहेत. दिग्गज गुंतवणूकदार आशिष कचोलिया यांनी देखील बालू फोर्ज इंडस्ट्रीज स्टॉकमध्ये गुंतवणूक केली आहे.
बालू फोर्ज कंपनीने सेबीला माहिती दिली आहे की, सिक्स्टिथ स्ट्रीट एशियन जेम्स फंडला बालू फोर्ज इंडस्ट्रीज कंपनीने 183.60 रुपये किमतीवर 25 लाख शेअर्स वाटप केले आहेत. या सिंगापूरस्थित विदेशी गुंतवणूक फर्मने बालू फोर्ज इंडस्ट्रीज स्टॉकमध्ये 45.90 कोटी रुपये गुंतवणूक केली आहे.
मागील 10 महिन्यांत बालू फोर्ज इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 289.5 टक्के परतावा कमावून दिला आहे. बाळू फोर्ज इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 1 डिसेंबर 2022 रोजी 54.70 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 9 ऑक्टोबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 212.50 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. बालू फोर्ज कंपनीच्या शेअर्सनी मागील 10 महिन्यांत 289 टक्के परतावा कमावून दिला आहे.
2023 या वर्षात बालू फोर्ज इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरची किंमत 221 टक्के वाढली आहे. मागील 6 महिन्यांत बालू फोर्ज इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सची किंमत 131 टक्के वाढली आहे. बाळू फोर्ज इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 230.90 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 53.90 रुपये होती.
शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणुकदार आशिष कचोलिया यांनी बालू फोर्ज इंडस्ट्रीज कंपनीचे 27 लाखांपेक्षा जास्त शेअर्स होल्ड केले आहेत. आशिष कचोलिया यांनी जून 2023 मध्ये बालू फोर्ज इंडस्ट्रीज कंपनीचे 21,65,500 शेअर्स खरेदी केले आहेत. आशिष कचोलिया व्यतिरिक्त शेअर बाजारातील आणखी एक दिगाज गुंतवणुकदार व्हीएस अय्यर यांनी देखील बालू फोर्ज इंडस्ट्रीज कंपनीच्या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये पैसे लावले आहेत. अय्यर यांनी बालू फोर्ज कंपनीचे 18,00,000 शेअर्स होल्ड केले आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.