
Bonus Shares | सध्या तुम्ही मोफत बोनस शेअर्स वाटप करणाऱ्या कंपनीमध्ये गुंतवणूक कडू इच्छित असाल तर, तुम्ही तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कामा होल्डिंग्ज लिमिटेड कंपनीने आपल्या शेअरधारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली होती. आज कामा होल्डिंग्ज लिमिटेड कंपनीचे शेअर्स एक्स-बोनस स्टॉक म्हणून ट्रेड करत आहेत. Kama Holdings Share Price
कामा होल्डिंग्स कंपनीने आपल्या विद्यमान पात्र शेअर धारकांना 1 शेअरवर 4 बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली होती. आज मंगळवार दिनांक 17 ऑक्टोबर 2023 रोजी कामा होल्डिंग्ज स्टॉक 5.69 टक्के वाढीसह 3,400 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
रेकॉर्ड डेट तपशील
कामा होल्डिंग्स कंपनीने सेबीला कळवले आहे की, कंपनीने आपले 10 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या एका शेअरवर 4 शेअर्स बोनस वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने बोनस शेअर वाटप करण्याची पात्रता निश्चित करण्यासाठी मंगळवार दिनांक 17 ऑक्टोबर 2023 हा दिवस रेकॉर्ड तारीख म्हणून जाहीर केली आहे. म्हणजेच या दिवशी ज्या गुंतवणूकदाराचे नाव कंपनीच्या रेकॉर्ड बुकमध्ये असेल, त्यांना कंपनी मोफत बोनस शेअर्स वाटप करेल.
लाभांश तपशील आणि स्टॉक कामगिरी
यापूर्वी मार्च 2023 मध्ये कामा होल्डिंग्ज लिमिटेड कंपनीने आपल्या शेअर धारकांना 84 रुपये लाभांश वाटप केला होता. नंतर याच वर्षी ऑगस्ट 2023 मध्ये देखील कामा होल्डिंग्ज लिमिटेड कंपनीने आपल्या शेअर धारकांना 82 रुपये लाभांश वाटप केला होता. यापूर्वी कामा होल्डिंग्स कंपनीने 2022 मध्ये खुल्या बाजारातून आपले शेअर्स परत खरेदी केले होते.
मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये कामा होल्डिंग्स कंपनीचे शेअर्स 0.74 टक्क्यांच्या वाढीसह 16,270.65 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील 6 महिन्यांत कामा होल्डिंग्ज लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 31 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरची किंमत 4 टक्क्यांनी वाढली आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.