Tata Technologies IPO | तयार राहा! अशी संधी पुन्हा मिळणार नाही, टाटा टेक्नॉलॉजी IPO बाबत मोठी बातमी, GMP ने लॉटरीचे संकेत

Tata Technologies IPO | मागील बऱ्याच महिन्यापासून शेअर बाजारातील गुंतवणुकदार टाटा टेक्नॉलॉजी कंपनीच्या IPO ची वाट पाहत आहेत. आता त्यांची प्रतीक्षा संपली आहे. मीडिया रिपोर्टनुसार टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचा IPO नोव्हेंबर 2023 च्या मध्यात लॉन्च होण्याची शक्यता आहे. टाटा टेक्नॉलॉजी कंपनीने यावर्षी मार्च 2023 मध्ये सेबीकडे आयपीओचे पेपर्स जमा केले होते. आणि त्याला सेबीने देखील तत्काळ मंजुरी दिली होती.

ग्रे मार्केटचा आढावा घेणाऱ्या तज्ञांच्या मते टाटा टेक्नॉलॉजी कंपनीच्या शेअर्सची मागणी वाढत चालली आहे. ग्रे मार्केटमध्ये टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स 280 रुपये प्रीमियम किमतीवर खरेदी विक्री केले जात आहेत. टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचे एकूण बाजार मुल्य 16,300 कोटी म्हणजेच जवळपास 2 अब्ज डॉलर्स आहे. शेअर बाजारातील तज्ञांच्या मते टाटा टेक्नॉलॉजी कंपनीच्या IPO चा आकार 3,800-4,000 कोटी रुपये असू शकतो.

DRHP कागदपत्रांनुसार टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचा IPO हा पूर्णपणे ऑफर फॉर सेल अंतर्गत खुला केला जाणार आहे. टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचे विद्यमान शेअर धारक टाटा मोटर्स, अल्फा टीसी होल्डिंग्ज आणि टाटा कॅपिटल ग्रोथ फंड हे IPO मध्ये आपले शेअर्स विकणार आहेत.

टाटा मोटर्स कंपनीने टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचे एकूण 74.69 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. टाटा टेक्नॉलॉजी कंपनीची मूळ कंपनी टाटा मोटर्स या IPO अंतर्गत 8.11 कोटी शेअर्स म्हणजेच जवळपास 20 टक्के भाग भांडवल खुल्या बाजारात विकणार आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tata Technologies IPO NSE 18 October 2023.