
Jio Financial Share Price | जिओ फायनान्शिअल कंपनीचे शेअर्स नुकताच शेअर बाजारात सूचीबद्ध झाले आहेत. मात्र लिस्ट झाल्यापासून शेअरमध्ये विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. आज देखील जिओ फायनान्शिअल कंपनीचे शेअर्स लोअर सर्किटमध्ये अडकले होते. असा स्थितीत रिलायन्स समूहाचां भाग असलेल्या जिओ फायनान्शिअल स्टॉक खरेदी करावा की करू नये, याबाबत गुंतवणूकदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. आज सोमवार दिनांक 23 ऑक्टोबर 2023 रोजी जिओ फायनान्शिअल स्टॉक 4.30 टक्के घसरणीसह 205.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
जिओ फायनान्शियल स्टॉक डिटेल :
* कंपनीचे बाजार भांडवल : 136 लाख कोटी
* शेअरची बुक व्हॅल्यू : 37.86 रुपये
* शेअरचे दर्शनी मूल्य : 10 रुपये
* सर्वकालीन उच्चांक किंमत : 266.95 रुपये
* शेअरची नीचांक किंमत : 202.80 रुपये
बजाज फायनान्स कंपनीचे शेअर्स सध्या 7770 रुपये किमतीजवळ ट्रेड करत आहेत. जिओ फायनान्शिअल कंपनीचे शेअर्स कधी या किंमत पातळीवर पोहोचतील का? असा प्रश्न गुंतवणूकदारांना देखील पडतो. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे जिओ फायनान्शिअल ही कंपनी भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या मालकीच्या रिलायन्स ग्रुपचा भाग आहे.
जिओ फायनान्शिअल कंपनीची सर्वात मोठी ताकद म्हणजे, ते आपल्या व्यवसायावर लक्ष केंद्रित करत आहेत. रिलायन्स ग्रुपमध्ये रिलायन्स रिटेल आणि रिलायन्स जिओ यासारख्या अनेक कंपन्या आहेत. या कंपन्यांच ग्राहक वर्ग प्रचंड मोठा आहे. याचा फायदा जिओ फायनान्शिअल कंपनीला होऊ शकतो.
भारतातील प्रमुख फायनान्शिअल कंपन्या :
* बजाज फायनान्स लिमिटेड
* टाटा कॅपिटल फायनन्शियल सर्व्हिसेस लिमिटेड
* आदित्य बिर्ला फायनान्स लिमिटेड
* एल अँड टी फायनान्स लिमिटेड
* मुथूट फायनान्स लिमिटेड
* महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड
* HDB फायनन्शियल सर्व्हिसेस
* पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.