 
						Sadhana Nitro Share Price | सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये साधना नायट्रो कंपनीचे शेअर्स 1.6 टक्क्यांच्या वाढीसह 83 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. साधना नायट्रो या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 2050 कोटी रुपये आहे. साधना नायट्रो केम कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 121 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 68 रुपये होती.
साधना नायट्रो केम लिमिटेड कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीनुसार, साधना नायट्रो कंपनी नायट्रोबेंझिनपासून PAP तयार करणारी जगातील दुसरी सर्वात मोठी कंपनी बनली आहे. आज गुरूवार दिनांक 26 ऑक्टोबर 2023 रोजी साधना नायट्रो स्टॉक 3.32 टक्के घसरणीसह 88.70 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.
साधना नायट्रो केम कंपनीला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने अमिनो फिनाईल उत्पादन करण्याची मंजुरी दिली आहे. साधना नायट्रो कंपनी आपल्या प्लांटमधून पॅरा अमिनो फिनाइलचे व्यावसायिक उत्पादन करायला सुरुवात करणार आहे. नायट्रो बेंझिनपासून पीएपी बनवणारी साधना नायट्रो ही जगातील दुसरी सर्वात मोठी कंपनी बनली आहे.
साधना नायट्रो केम या विशेष केमिकल कंपनीची स्थापना 1973 साली झाली होती. या कंपनीचा प्लांट एमआयडीसीमध्ये सुमारे 22 एकर जागेवर पसरला आहे. आणि ही कंपनी भारत सरकारद्वारे मान्यताप्राप्त 2 स्टार गोल्डन एक्सपोर्ट हाउस सुविधा प्रदान करणारी कंपनी आहे. या कंपनीची 80 टक्के विक्री विविध देशात होणाऱ्या निर्यातीच्या माध्यमातून होते. ही कंपनी जगभरात जपान, चीन, स्वित्झर्लंड, अमेरिका, जर्मनी, युरोप, दक्षिण कोरिया यादेशात निर्यात करते.
साधना नायट्रो केम कंपनीचे शेअर्स 40 पैशांवरून वाढून 121 रुपये किमतीवर पोहचले होते. याकाळात कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 29000 टक्के परतावा कमावून दिला आहे. साधना नायट्रो केम कंपनीने 27 जून 2023 रोजी आपल्या पात्र गुंतवणूकदारांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली होती.
साधना नायट्रो केम लिमिटेडच्या संचालक मंडळाने आपल्या 1 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या 9 इक्विटी शेअर्सवर दोन बोनस शेअर्स मोफत वाटप करण्याची घोषणा केली होती. म्हणजेच ज्या गुंतवणूकदारांकडे साधना नायट्रो कंपनीचे 9 शेअर्स होते, त्यांना बोनस म्हणून दोन शेअर्स मोफत मिळाले होते. यासोबतच कंपनीने आपल्या शेअरधारकांना 15 टक्के लाभांश देखील वाटप केला होता.
सध्या चीनमध्ये कच्च्या मालाच्या किमती स्थिर झाले आहेत, आणि भारतीय कंपन्या आपली उत्पादन क्षमता वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. साधना नायट्रो कंपनीला अपेक्षा आहे की, कंपनीचे मार्जिन अधिक वाढले 2023-24 या चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत कंपनीच्या महसुलात 40 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे.
साधना नायट्रो केम लिमिटेड या कंपनीची स्थापना 1973 साली झाली होती. साधना नायट्रो ही कंपनी एक अग्रगण्य मध्यवर्ती विशेष रासायन क्षेत्रात व्यवसाय करणारी कंपनी आहे. ही कंपनी MIDC विभागात 22 एकरवर पसरलेल्या प्लांटच्या माध्यमातून आपले काम करते. या कंपनीचे जवळपास 80 टक्के उत्पादन बाहेरच्या देशात निर्यात केले जाते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		