19 May 2024 8:44 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI FD Interest Rates | SBI ग्राहकांनो! FD व्याजाचे नवे दर समजून घ्या, अन्यथा नुकसान, सर्व ग्राहकांना लाभ नाही Numerology Horoscope | 20 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 20 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या OPPO A59 5G | फक्त 12600 रुपयांत सर्वात स्वस्त 5G OPPO फोन, 128GB स्टोरेज आणि बरंच काही Tata Nexon | टाटा नेक्सॉन CNG व्हेरियंटमध्ये लवकरच लाँच होतंय, जाणून घ्या किती बदलणार SUV Swift Dzire Price | ब्रेकिंग! न्यू डिझायर कारची डिटेल्स फोटोसहित लीक, सर्व फीचर्स जाणून घ्या, 6 एअरबॅग्स HDFC Home Loan | पगारदारांनो! तुम्ही गृहकर्ज घेतलंय का? हे काम करा, व्याज कमी होईल आणि मॅनेज करणंही सोपं
x

Stocks To Buy | 1 नंबर! शॉर्ट-टर्म गुंतवणुकीसाठी हे टॉप 3 शेअर्स सेव्ह करा, 50 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल

Stocks To Buy

Stocks To Buy | मागील काही आठवड्यापासून भारतीय शेअर बाजारात मंदीमुळे पडझड पाहायला मिळत आहे. मात्र मंदीच्या काळात देखील असे काही शेअर्स आहेत, जे गुंतवणुकदारांना आकर्षित करत आहेत. तज्ञांनी या कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. शेअर बाजारातील तज्ञांनी दीर्घकालीन गुंतवणूकीसाठी कोचीन शिपयार्ड, पोझिशनल झायडस वेलनेस आणि अल्पकालीन गुंतवणूकीसाठी ज्योती लॅब स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे.

कोचीन शिपयार्ड :
शेअर बाजारातील तज्ञांनी दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी कोचीन शिपयार्ड स्टॉकमध्ये पैसे लावण्याचा सल्ला दिला आहे. कोचीन शिपयार्ड ही मिनीरत्न दर्जा प्राप्त सरकारी कंपनी आहे. मागील दोन दिवसांपासून या कंपनीचे शेअर्स घसरणीसह ट्रेड करत आहेत. शेअर बाजारातील तज्ञांनी या कंपनीच्या शेअरवर 1400 रुपये दीर्घकालीन लक्ष्य किंमत जाहीर केली आहे. गुंतवणूक करताना तज्ञांनी 830 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. या कंपनीच्या शेअरची टार्गेट प्राईस सध्याच्या किंमतीच्या तुलनेत 50 टक्के जास्त आहे.

कोचीन शिपयार्ड या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 1258 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 410 रुपये होती. मागील तीन महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 50 टक्के, मागील सहा महिन्यांत 95 टक्के, 2023 या वर्षात 85 टक्के, मागील एका वर्षात 75 टक्के, मागील तीन वर्षांत 180 टक्के नफा कमावून दिला आहे. शुक्रवार दिनांक 27 ऑक्टोबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.56 टक्के वाढीसह 984.70 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

Zydus Wellness :
शेअर बाजारातील तज्ञांनी या कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या कंपनीच्या शेअरवर 1350 रुपये स्टॉपलॉस लावून 1870 रुपये लक्ष किमतीसाठी गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 1790 रुपये होती. तर नीचांक परकी किंमत 1370 रुपये होती. शुक्रवार दिनांक 27 ऑक्टोबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.11 टक्के वाढीसह 1,550.05 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

ज्योती लॅब :
शेअर बाजारातील तज्ञांनी ज्योती लॅब कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या कंपनीच्या शेअरवर शॉर्ट टर्म टार्गेट 475 रुपये आणि स्टॉपलॉस 288 रुपये जाहीर केला आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 412 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 180 रुपये होती.

मागील तीन महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 18 टक्के, मागील सहा महिन्यांत 85 टक्के आणि 2023 यावर्षात 75 टक्के नफा कमावून दिला आहे. शुक्रवार दिनांक 27 ऑक्टोबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.08 टक्के वाढीसह 360.05 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Stocks To Buy for investment on 28 October 2023.

हॅशटॅग्स

#Stocks To BUY(283)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x