 
						Adani Gas Share Price | अदानी ग्रुपचा भाग असलेल्या अदानी टोटल गॅस कंपनीने आपले तिमाही जाहीर केले आहेत. या तिमाहीत कंपनीच्या नफ्यात 20 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. मात्र 2023 या वर्षात कंपनीचे शेअर्स 84 टक्क्यांनी कमजोर झाले आहेत.
अदानी टोटल गॅस कंपनीने चालू आर्थिक वर्षाच्या सप्टेंबर तिमाहीत 20 टक्क्यांच्या वाढीसह 168 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. अदानी टोटल गॅस कंपनीचे तिमाही निकाल गुंतवणूकदारांना आकर्षित करू शकतात. आज गुरूवार दिनांक 2 नोव्हेंबर 2023 रोजी अदानी टोटल गॅस स्टॉक 0.80 टक्के वाढीसह 556.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
अदानी टोटल गॅस कंपनीने 2023 या वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 84 टक्के परतावा कमावून दिला आहे. हिंडेनबर्ग अहवाल येण्यापूर्वी अदानी टोटल गॅस स्टॉक 4000 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 564.40 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. ज्या लोकांनी फेब्रुवारी महिन्यात अदानी टोटल गॅस स्टॉकवर 1 लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 16000 रुपये झाले आहे.
अदानी टोटल गॅस कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 522 रुपये होती. मागील सहा महिन्यांत हा कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 41 टक्के नकारात्मक परतावा दिला आहे. आणि मागील एका महिन्यात देखील हा स्टॉक 7 टक्क्यांनी घसरला आहे. अदानी टोटल गॅस ही कंपनी अदानी समूह आणि फ्रान्सच्या TotalEnergies कंपनीने स्थापन केलेला संयुक्त उपक्रम आहे.
अदानी टोटल गॅस कंपनीवर कमी कर्ज आहे. मुख्य व्यवसायातून रोख उत्पन्न निर्माण करण्याच्या क्षमतेमुळे ऑपरेशन्समधील रोख प्रवाह मागील 2 वर्षांपासून सकारात्मक पातळीवर स्थिर आहे. तसेच कंपनीचा वार्षिक निव्वळ नफा आणि प्रति शेअर बुक व्हॅल्यू मागील 2 वर्षापासून सुधारली आहे. अदानी टोटल गॅस कंपनी अदानी समूहाची शून्य प्रवर्तक तारण असलेली कंपनी म्हणून ओळखली जाते.
अदानी टोटल कंपनीने शेअर धारकांच्या निधीचा अकार्यक्षम वापर केल्यामुळे मागील 2 वर्षापासून कंपनीच्या ROE मध्ये घसरण झाली आहे. मागील 2 वर्षात कंपनीच्या ROA मध्येही घट पाहायला मिळाली आहे. तज्ञांच्या मते कंपनीच्या स्टॉकची वाढ खूप कमकुवत आहे. आणि किंमत अल्पकालीन, मध्यमकालीन आणि दीर्घकालीन सरासरी किमतीच्या खाली आहे.
सीएनजीच्या विक्रीत आणि किमतीत वाढ झाल्याने कंपनीच्या तिमाही निकालांमध्ये विशेष वाढ पाहायला मिळत आहे. अदानी टोटल गॅस कंपनीने आपल्या निकालात म्हटले आहे की, जुलै-सप्टेंबर 2022 मध्ये अदानी टोटल गॅस कंपनीने 139 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.
सप्टेंबर 2023 तिमाहीत सीएनजीची विक्री 20 टक्क्यांच्या वाढीसह 113 दशलक्ष/घनमीटरवर पोहचली आहे. आणि पाइपद्वारे होणाऱ्या गॅस सप्लाय मध्ये 3 टक्क्यांची घट झाली असून, 75 दशलक्ष/घनमीटर आली आहे. अदानी टोटल गॅस कंपनीचे उत्पन्न 1,178 कोटी रुपये नोंदवले गेले आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		