
Atul Auto Share Price | शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार विजय केडिया यांनी अतुल ऑटो कंपनीचे शेअर्स खरेदी करून मोठी गुंतवणूक केली आहे. विजय केडियाच्या पोर्टफोलिओमध्ये अतुल ऑटो लिमिटेड कंपनीचे 50,50,505 शेअर्स आहेत. विजय केडीया यांनी अतुल ऑटो कंपनीचे एक 18.20 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत.
जून 2023 तिमाहीच्या अखेरीस विजय केडियानी अतुल ऑटो कंपनीचे 13.70 टक्के भाग भांडवल धारण केले होते. आता सप्टेंबरच्या नवीन तिमाही डेटानुसार विजय केडीया यांनी अतुल ऑटो कंपनी मधील आपला वाटा 4.50 टक्केने वाढवला आहे. आज शुक्रवार दिनांक 3 नोव्हेंबर 2023 रोजी अतुल ऑटो स्टॉक 0.95 टक्के वाढीसह 618.00 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.
अतुल ऑटो कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. 30 डिसेंबर 2002 रोजी अतुल ऑटो कंपनीचे शेअर्स 1.13 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आता 2 नोव्हेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 611.60 रुपये किमतीवर पोहोचले आहेत.
या काळात अतुल ऑटो कंपनीच्या गुंतवणूकदारांनी तब्बल 54000 टक्क्यांपेक्षा जास्त नफा कमावला आहे. जर तुम्ही 30 डिसेंबर 2002 रोजी अतुल ऑटो कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते, तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 5.4 कोटी रुपये झाले असते.
ऑटो लिमिटेड कंपनीच्या शेअरने मागील 3 वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना 290 टक्के परतावा कमावून दिला आहे. 30 ऑक्टोबर 2020 रोजी या कंपनीचे शेअर्स 157.10 रुपये किमतीवर पोहचले आहेत. अतुल ऑटो कंपनीचे शेअर्स 2 नोव्हेंबर 2023 रोजी 611.60 रुपये किमतीवर पोहोचले आहेत.
मागील एका वर्षात अतुल ऑटो कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 123 टक्के नफा कमावून दिला आहे. 3 नोव्हेंबर 2022 रोजी अतुल ऑटो कंपनीचे शेअर्स 273.95 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आता या कंपनीचे शेअर्स 618 रुपये किमतीवर पोहोचले आहेत. अतुल ऑटो कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 683.30 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 239.80 रुपये होती.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.