19 May 2024 5:34 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI FD Interest Rates | SBI ग्राहकांनो! FD व्याजाचे नवे दर समजून घ्या, अन्यथा नुकसान, सर्व ग्राहकांना लाभ नाही Numerology Horoscope | 20 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 20 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या OPPO A59 5G | फक्त 12600 रुपयांत सर्वात स्वस्त 5G OPPO फोन, 128GB स्टोरेज आणि बरंच काही Tata Nexon | टाटा नेक्सॉन CNG व्हेरियंटमध्ये लवकरच लाँच होतंय, जाणून घ्या किती बदलणार SUV Swift Dzire Price | ब्रेकिंग! न्यू डिझायर कारची डिटेल्स फोटोसहित लीक, सर्व फीचर्स जाणून घ्या, 6 एअरबॅग्स HDFC Home Loan | पगारदारांनो! तुम्ही गृहकर्ज घेतलंय का? हे काम करा, व्याज कमी होईल आणि मॅनेज करणंही सोपं
x

SBI Share Price | एसबीआय बँक शेअर्स तेजीचे संकेत, तज्ज्ञांनी जाहीर केली शेअरची पुढची टार्गेट प्राईस, फायदा घेणार का?

SBI Share Price

SBI Share Price | एसबीआय बँकेच्या शेअरमध्ये मजबूत वाढीचे संकेत मिळत आहेत. पुढील कळतंय बँकेचे शेअर्स 790 रुपये किंमत स्पर्श करू शकतात, असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. ही किंमत सध्याच्या किमतीच्या तुलनेत 37 टक्के अधिक आहे. ब्रोकरेज फर्म बीएनपी परिबास सिक्युरिटीज फर्मने सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एक नोट जारी करून एसबीआय बँक स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

यासाठी तज्ञांनी 790 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. 5 नोव्हेंबर 2023 रोजी प्रभुदास लिलाधर फर्मने एसबीआय बँक स्टॉकवर 770 रुपये लक्ष किंमत जाहीर केली होती. आज बुधवार दिनांक 8 नोव्हेंबर 2023 रोजी एसबीआय बँक स्टॉक 0.17 टक्के वाढीसह 580.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

ब्रोकरेज फर्म जेएम फायनान्शिअलने एसबीआय बँक स्टॉकवर 710 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. शेअर बाजारातील दिग्गज 41 पैकी 24 तज्ञांनी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याची शिफारस केली आहे. 13 तज्ञांनी स्टॉकवर बाय रेटिंग दिली आहे. तर 41 तज्ञापैकी फक्त 2 जणांनी स्टॉक होल्ड करण्याचा सल्ला दिला आहे.

मागील पाच वर्षात एसबीआय बँकेचा ROE 0.5 वरून वाढून 18.05 टक्क्यांवर पोहचला आहे. SBI च्या इक्विटीवरील स्टँडअलोन रिटर्न मागील पाच वर्षांपासून सतत वाढत आहे. 2019 मध्ये एसबीआय बँक स्टॉकचा ROE 0.35 टक्के नोंदवला गेला होता. 2020 मध्ये बँकेचा ROE 6.74 टक्क्यांवर होता, तर 2021 मध्ये तो 9.02 टक्केवर आणि 2022 मध्ये 12.91 टक्क्यांवर पोहोचला होता.

2023 मध्ये एसबीआय बँक इक्विटी परतावा 18.05 टक्के नोंदवला गेला आहे. एसबीआय बँकेच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 629.55 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 499.35 रुपये होती. मागील पाच वर्षांत या एसबीआय बँकेच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 102 टक्क्यांपेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| SBI Share Price today on 8 November 2023

हॅशटॅग्स

#SBI Share Price(16)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x