10 May 2024 10:40 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Income Tax Refund | पगारदारांनो! ITR भरल्यानंतर 'हे' काम केल्यास तुम्हाला टॅक्स रिफंडचे पैसे लवकर मिळतील Swift Price | फक्त 65000 रुपयांमध्ये नवी स्विफ्ट घरी आणा, केवळ एवढा असेल EMI, सर्व व्हेरियंट डिटेल्स जाणून घ्या Numerology Horoscope | 10 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 10 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, 1 वर्षात दिला 290% परतावा, कंपनीबाबत आली मोठी अपडेट Spright Agro Share Price | 65 पैशाच्या शेअरची कमाल! अवघ्या 1 वर्षात 5000% परतावा दिला, खरेदीला आजही स्वस्त Gold Rate Today | गुड-न्यूज! आज अक्षय्य तृतीयेच्या 1 दिवस आधी सोन्याचा भाव धडाम, पटापट नवे दर तपासून घ्या
x

Alok Industries Share Price | 19 रुपयाचा शेअर वेळीच खरेदी करणार? आलोक इंडस्ट्रीज रिलायन्स इंडस्ट्रीजकडून भांडवल उभारणी करणार

Alok Industries Share Price

Alok Industries Share Price | आलोक इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरमध्ये प्रचंड चढ उतार पाहायला मिळत आहे. मागील काही दिवसांपासून तेजीत व्यवहार करणाऱ्या आलोक इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरमध्ये आज विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आलोक इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 8 टक्क्यांच्या वाढीसह 19.87 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

8 सप्टेंबर 2023 रोजी आलोक इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 22.33 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 8 नोव्हेंबर 2023 रोजी आलोक इंडस्ट्रीज स्टॉक 1.28 टक्के घसरणीसह 19.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

आलोक इंडस्ट्रीज कंपनीच्या संचालक मंडळाने 7 नोव्हेंबर 2023 रोजी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत 3300 कोटी रुपये मूल्याचे नॉन कन्व्हर्टेबल डिबेंचर जारी करण्यास मंजुरी दिली आहे. आलोक इंडस्ट्रीज कंपनी मुकेश अंबानीं यांच्या रिलायन्स कंपनीकडून 3300 कोटी रुपये भांडवल उभारणी करणार आहे. सप्टेंबर 2023 च्या तिमाहीत आलोक इंडस्ट्रीज कंपनीने निव्वळ विक्रीत 19.99 टक्के घट नोंदवली आहे. या तिमाहीत कंपनीने फक्त 1,359.02 कोटी रुपयेची विक्री केली आहे.

सप्टेंबर 2022 मध्ये कंपनीने 1,698.58 कोटी रुपयेची विक्री केली होती. सप्टेंबर 2023 आलोक इंडस्ट्रीज कंपनीचा निव्वळ तोटा 174.83 कोटी रुपयेवर पोहोचला आहे. तर सप्टेंबर 2023 मध्ये कंपनीचा एबिटा 46.18 कोटी रुपये नोंदवला गेला आहे.

मागील वर्षीच्या तुलनेत या तिमाहीत कंपनीचा EBITDA 140.27 टक्के वाढला आहे. 31 मार्च 2023 रोजीच्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीने आलोक इंडस्ट्रीज कंपनीचे एकूण 75 टक्के भाग भांडवल धारण केले आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Alok Industries Share Price NSE 08 November 2023.

हॅशटॅग्स

Alok Industries Share Price(15)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x