
IFL Share Price | आयएफएल एंटरप्रायझेस कंपनीचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये विक्रीच्या दबावात क्लोज झाले होते. मात्र दिवसभराच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स तेजीत वाढत होते. शुक्रवारी दिवसभराच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आयएफएल एंटरप्रायझेस लिमिटेड कंपनीचे शेअर्स 1 टक्क्यांच्या वाढीसह 6.86 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
आयएफएल एंटरप्रायझेस कंपनीच्या शेअर्सने मागील 5 दिवसांत आपल्या गुंतवणूकदारांना 2 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 5 वर्षांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 1700 टक्क्यांपेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे. शुक्रवार दिनांक 10 नोव्हेंबर 2023 रोजी आयएफएल एंटरप्रायझेस स्टॉक 2.79 टक्के घसरणीसह 6.61 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
आयएफएल एंटरप्रायझेस कंपनीचे एकूण बाजार भांडवल 156 कोटी रुपये आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 19 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 6.40 रुपये होती. IFL Enterprises कंपनीने दिलेल्या माहितीनुसार कंपनीचे प्रवर्तक पुढील 12 ते 18 महिन्यांत आपली हिस्सेदारी 2 टक्केवरून वाढवून 9 टक्केवर नेणार आहे.
आयएफएल एंटरप्रायझेस कंपनीचे प्रवर्तक खुल्या बाजारातून 11 लाख शेअर्स खरेदी करणार आहेत. आयएफएल एंटरप्रायझेस कंपनीचे प्रवर्तक खुल्या बाजारातून कंपनीचे शेअर्स खरेदी करत आहेत, म्हणजे कंपनीच्या प्रवर्तकांना कंपनीच्या कार्यप्रणालीवर आणि महसूल वाढीवर मजबूत विश्वास आहे.
आयएफएल एंटरप्रायझेस कंपनीच्या प्रवर्तकांनी कंपनीमध्ये गुंतवणूक वाढवल्याने स्टॉकमध्ये तेजी पाहायला मिळत आहे. आता आयएफएल एंटरप्रायझेस कंपनी आपल्या शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करणार आहे. IFL एंटरप्रायझेस कंपनीने आपल्या शेअर धारकांना 1 रुपये दर्शनी मुल्य असलेल्या 10 शेअर वर एक बोनस शेअर्स मोफत देण्याची घोषणा केली आहे.
यासह आयएफएल एंटरप्रायझेस कंपनीने आपल्या शेअर धारकांना अंतरिम लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. मोफत बोनस शेअर्स आणि लाभांश फायदा घेण्यासाठी तुम्ही IFL एंटरप्रायझेस कंपनीचे शेअर्स खरेदी करू शकता.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.