19 May 2024 12:04 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
My EPF Pension Money | नोकरदारांनो! आजच 'अर्ली पेन्शन' साठी ऑनलाईन अर्ज करा, अकाउंटमध्ये पैसे जमा होतील Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव मजबूत वाढला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या HDFC Mutual Fund | पगारदारांनो! या फंडात SIP बचत करा, अवघ्या 5 वर्षात मिळेल 50 लाख रुपये परतावा Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 19 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | तज्ज्ञांकडून PSU BEL शेअरला 'BUY' रेटिंग, यापूर्वी दिला 700% परतावा, खरेदीला ऑनलाईन गर्दी Bonus Shares | पटापट मल्टिबॅगर परतावा देतोय हा शेअर, फ्री बोनस शेअर्स जाहीर, संधी सोडू नका Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, यापूर्वी 245% परतावा दिला
x

SBI Share Price | सरकारी स्टेट बँकेचा शेअर करून देईल मोठी कमाई, तज्ज्ञांनी जाहीर केली टार्गेट प्राईस, किती फायदा होईल?

SBI Share Price

SBI Share Price | स्टेट बँक ऑफ इंडिया या भारतातील सर्वात मोठ्या बँकेने आपले चालू आर्थिक वर्षाच्या सप्टेंबर 2023 तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. अनेक देशी तसेच परकीय ब्रोकरेज फर्मने स्टेट बँक ऑफ इंडिया स्टॉकमध्ये गुंतवणूक कण्याचा सल्ला दिला आहे.

तज्ञांच्या मते या बँकेचे शेअर्स पुढील दिवाळी पर्यंत गुंतवणूकदारांना मजबूत कमाई करून देईल. 6 नोव्हेंबर 2023 रोजी SBI स्टॉक 0.51 टक्क्यांच्या घसरणीसह 575.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. आज सोमवार दिनांक 13 नोव्हेंबर 2023 रोजी स्टेट बँक ऑफ इंडिया स्टॉक 581.30 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.

चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत एसबीआय बँकेने 8 टक्के वाढीसह 14,330 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाची वार्षिक कर्ज वाढ 12 टक्के आणि तिमाही कर्ज वाढ 3 टक्के नोंदवली गेली आहे. देशांतर्गत ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवालने देखील एसबीआय बँकेच्या शेअर्समध्ये गुंतवणुक करण्याचा सल्ला दिला आहे.

तज्ञांनी या स्टॉकवर 700 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. ब्रोकरेज फर्म शेअरखानने देखील गुंतवणूकदारांना एसबीआय बँकेच्या स्टॉकमध्ये पैसे लावण्याची शिफारस केली आहे. तज्ञांच्या मते एसबीआय बँक स्टॉक पुढील काळात 710 रुपये किंमत स्पर्श करू शकतो. ग्लोबल ब्रोकरेज फर्म CLSA be देखील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शेअर्सवर 700 रुपये लक्ष किंमत निश्चित केली आहे.

ग्लोबल ब्रोकरेज फर्म गोल्डमन सॅक्सनेही शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना एसबीआय बँकेच्या शेअरमध्ये पैसे लावण्याचा सॉला दिला आहे. यासाठी त्यांनी शेअरची लक्ष्य किंमत 746 रुपयेवरून कमी करून 710 रुपये जाहीर केली आहे. जेफरीज फर्मने देखील SBI स्टॉकवर 780 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. तर जेपी मॉर्गनने एसबीआय स्टॉकवर ओव्हरवेट रेटिंग देऊन शेअर 725 रुपये लक्ष किमतीसाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | SBI Share Price NSE 13 November 2023.

हॅशटॅग्स

#SBI Share Price(16)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x