
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरमध्ये मागील काही दिवसांपासून विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. बुधवार दिनांक 22 नोव्हेंबर 2023 रोजी सुझलॉन एनर्जी स्टॉक 5 टक्के लोअर सर्किटसह 37.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील काही महिन्यांच्या सलग तेजीनंतर सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरमध्ये नफा वसुली पाहायला मिळत होती. आज शेअर्स 4.95% वाढीसह 39.20 रुपयांवर ट्रेड करत आहेत.
28 मार्च 2023 रोजी सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 6.96 रुपये या आपल्या 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. तर 17 नोव्हेंबर रोजी या कंपनीचे शेअर्स 44 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते.
मागील सहा महिन्यांत सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स तब्बल सहा पट अधिक वाढले आहेत. सप्टेंबर 2023 तिमाहीमध्ये सुझलॉन एनर्जी कंपनीने 45 टक्के वाढीसह 102 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. या तिमाहीत सुझलॉन एनर्जी कंपनीने 1417 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. तर मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीने 1430 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. मागील वर्षी सुझलॉन एनर्जी कंपनीचा EBITDA 169.7 कोटी रुपये होता, जो या तिमाहीत 32.6 टक्क्यांनी वाढून 225 कोटी रुपये नोंदवला गेला आहे.
मागील आर्थिक वर्षात सुझलॉन एनर्जी कंपनीचा EBITDA मार्जिन 11.9 टक्के होता, जो आता 15.9 टक्क्यांवर पोहचला आहे. तज्ञांच्या मते सुझलॉन एनर्जी कंपनीच्या गुंतवणूकदारांनी सध्या नफा वसुली करावी. सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत व्हॉल्यूमसह ब्रेकआउट पाहायला मिळत आहे. तज्ञांनी या कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक करताना 40 रुपये किमतीवर स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला दिला होता.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.