
Tata Power Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा पॉवर कंपनीच्या स्टॉकबाबत एक खुशखबर आहे. क्रिसिल रेटिंग्सने कंपनीने टाटा पॉवर स्टॉकची रेटिंग ‘स्थिर’ वरून ‘पॉझिटिव्ह’ अशी अपडेट केली आहे. टाटा पॉवर कंपनीने आपल्या निवेदनात म्हंटले आहे की, क्रिसिल रेटिंग्स लिमिटेड कंपनीने टाटा पॉवर कंपनीच्या स्टॉकवर आपला दृष्टीकोन ‘AA / Stable’ वरून ‘AA / Positive’ असा अपडेट केला आहे.
क्रिसिल रेटिंग्स कंपनीच्या मते, टाटा पॉवर कंपनी आर्थिक वर्ष 2024-2025 मध्ये 12,000 कोटींपेक्षा जास्त कमाई करण्याची शक्यता आहे. यापूर्वी तज्ञांनी टाटा पॉवर कंपनीचे कमाईचा अंदाज आर्थिक वर्ष 2023 साठी 11,500 कोटी रुपये व्यक्त केला होता. गुरुवारी टाटा पॉवर शेअर्स 0.57% घसरून 261 रुपयांवर ट्रेड करत आहेत.
आर्थिक वर्ष 2022 मध्ये तज्ञांनी या कंपनीची अंदाजित कमाई 9,600 कोटी रुपये व्यक्त केली होती. आर्थिक वर्ष 2023-2024 च्या पहिल्या सहामाहीत टाटा पॉवर कंपनीचा EBITDA 6,694 कोटी रुपये होता.
टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स मार्च 2023 मध्ये नीचांक किमतीवर ट्रेड करत होते. तर आता 45 टक्के वाढले आहेत. 28 मार्च 2023 रोजी टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स 183.95 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आता या कंपनीचे शेअर्स 260.40 रुपये किमतीवर पोहचले आहे.
मागील सहा महिन्यांत टाटा पॉवर कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 27.87 टक्के परतावा कमावून दिला आहे. 2023 या वर्षात टाटा पॉवर कंपनीच्या शेअर्सची किंमत 24.27 टक्के वाढली आहे. तज्ञांच्या मते टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स पुढील काळात 272 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 276.50 रुपये होती.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.