21 May 2024 12:36 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Infosys Share Price | कमाईची संधी सोडू नका! Infosys आणि TCS सहित हे 7 शेअर्स मजबूत परतावा देणार Hot Stocks | पैशाचा पाऊस पाडणारे 9 स्वस्त पेनी शेअर्स, अवघ्या 5 दिवसात 82 टक्केपर्यंत परतावा मिळतोय Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा! तज्ज्ञांकडून टाटा मोटर्स शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल मजबूत परतावा Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, संधी सोडू नका Home Loan Down Payment | पगारदारांनो! गृहकर्जासाठी डाऊन पेमेंटची रक्कम सहज मॅनेज होईल, फॉलो करा या टिप्स My EPF Money | नोकरदारांनो! कठीण काळात तुमचे EPF चे पैसे डुबतील, नियम बदलला, कुटुंबालाही कल्पना देऊन ठेवा Demat Account | शेअर्स गुंतवणूकदारांसाठी अलर्ट, ट्रान्झॅक्शन चार्जेससहित डीमॅट खात्याशी संबंधित नियमात बदल
x

Stocks To Buy | मागील 1 महिन्यात 30 टक्के परतावा देणाऱ्या शेअरवर अजून कमाईची मोठी संधी, नवीन टार्गेट प्राईस

Stocks To Buy

Stocks To Buy | मागील काही महिन्यांपासून वस्त्रोद्योग क्षेत्रात प्रचंड वाढ पाहायला मिळत आहे. वास्तविक बांगलादेश जगातील सर्वात मोठा कापडाचा निर्यातदार देश म्हणून ओळखला जातो. मात्र आता या देशात कामगारांनी वेतनवाढीसाठी संप सुरू केला आहे. त्यामुळे भारतीय कापड निर्यातदारांना जबरदस्त फायदा होत आहे.

अल्पकालीन गुंतवणूक करून फायदा कमावण्यासाठी ब्रोकरेज फर्मने इंडो काउंट इंडस्ट्रीज या टेक्सटाइल कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. शुक्रवार दिनांक 24 नोव्हेंबर 2023 रोजी इंडो काउंट इंडस्ट्रीज स्टॉक 4.94 टक्के वाढीसह 304.40 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. मागील एका महिन्यात या स्मॉलकॅप स्टॉकने आपल्या गुंतवणुकदारांना 30 टक्के परतावा कमावून दिला आहे.

जग भरात मोठमोठ्या कपड्यांच्या ब्रँड असलेल्या कंपन्यांना बांगलादेशातून कापड पुरवठा केला जातो. सध्या बांगलादेशात कामगारांनी वेतनवाढीसाठी संप सुरू केला आहे, त्यामुळे कापड उत्पादन आणि पुरवठ्यावर याचा नकारात्मक परिणाम पडला आहे. ब्रिटनने केलेली FTA बाबत सुधारणा ही देखील जागतिक वस्त्रोद्योगासाठी सकारात्मक बातमी आहे.

ब्रोकरेज फर्म ICICI सिक्युरिटीजने पुढील 3 महिन्यांसाठी इंडो काउंट इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरमध्ये पैसे लावण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते या कंपनीचे शेअर्स पुढील 3 महिन्यांत 345 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. गुंतवणूक करताना तज्ञांनी 264 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. इंडो काउंट इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स खरेदी करण्यासाठी 290-297 रुपये किंमत योग्य राहील.

शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये इंडो काउंट इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 312 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. तर नीचांक पातळी किंमत 101 रुपये होती. इंडो काउंट इंडस्ट्रीज कंपनीचे एकूण बाजार भांडवल 6000 कोटी रुपये होते.

मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 30 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील तीन महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 22 टक्के नफा कमावून दिला आहे. 2023 या वर्षात इंडो काउंट इंडस्ट्रीज स्टॉक 125 टक्के मजबूत झाला आहे. तर मागील एका वर्षात इंडो काउंट इंडस्ट्रीज स्टॉकने लोकांचे पैसे 130 टक्के वाढवले आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Stocks To Buy call for investment 25 November 2023.

हॅशटॅग्स

#Stocks To BUY(283)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x