 
						Tata Power Share Price| टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा पॉवर कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. विविध ब्रोकरेज हाऊसने टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. मागील पाच वर्षांत टाटा पॉवर कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 250 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे.
तज्ञांच्या मते, टाटा पॉवर कंपनीचा निव्वळ नफा पुढील 4 वर्षांत दुप्पट होऊ शकतो. आज शुक्रवार दिनांक 1 डिसेंबर 2023 रोजी टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स 2.58 टक्के वाढीसह 274.80 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
ब्रोकरेज फर्म अँटिक स्टॉक ब्रोकिंगने टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. तज्ञांनी या स्टॉकवर 303 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. 29 नोव्हेंबर 2023 रोजी टाटा पॉवर कंपनीचे शेअर 273 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. सध्याच्या किंमतीपेक्षा हा स्टॉक 10-11 टक्क्यांनी वाढू शकतो. 2023 या वर्षात टाटा पॉवर स्टॉकने गुंतवणुकदारांना 25 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 5 वर्षात टाटा पॉवर कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 250 टक्के नफा कमावून दिला आहे.
तज्ञांच्या मते, टाटा पॉवर कंपनी आर्थिक वर्ष 2027.पर्यंत 60,000 कोटी रुपये बाजार भांडवल उद्दिष्ट साध्य करू इच्छिते. यामध्ये अक्षय ऊर्जेचा वाटा 45 टक्के असेल. टाटा पॉवरने आपल्या PSP प्रकल्पांसाठी स्वतंत्रपणे 15 टक्के भांडवल खर्च करण्याची योजना आखली आहे. तर T&D वर कंपनी 34 टक्के भांडवल खर्च करण्याची विचार करत आहे.
टाटा पॉवर कंपनीने आर्थिक वर्ष 2027 पर्यंत 1.1 लाख कोटी रुपये महसूल संकलित करण्याचे लक्ष निर्धारित केले आहे. पुढील 4 वर्षांत कंपनीने 20,000 कोटी रुपये ऑपरेटिंग नफा आणि 7600 कोटी रुपये निव्वळ नफा कमावण्याचे लक्ष निर्धारित केले आहे. हे लक्ष्य आर्थिक वर्ष 2023 च्या तुलनेपेक्षा दुप्पट आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		