
Net Avenue Technologies IPO | नेट अव्हेन्यू टेक्नॉलॉजी कंपनीच्या IPO ला गुंतवणूकदारांनी जबरदस्त प्रतिसाद दिला आहे. या कंपनीचा IPO स्टॉक ग्रे मार्केटमध्ये देखील मजबूत कामगिरी करत आहे. ओपनिंगच्या दुसऱ्या दिवशी नेट अव्हेन्यू टेक्नॉलॉजी कंपनीच्या IPO ला 54 पट अधिक बोली प्राप्त झाली होती.
नेट अव्हेन्यू टेक्नॉलॉजी कंपनीने आपल्या IPO शेअरची किंमत बँड 16 ते 18 रुपये निश्चित केली होती. नेट अव्हेन्यू टेक्नॉलॉजी कंपनीचा IPO 1 डिसेंबर 2023 रोजी गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. आज 4 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचा IPO बंद होणार आहे.
नेट अव्हेन्यू टेक्नॉलॉजी या SME कंपनीच्या IPO ला पहिल्या दिवशी 14 पट अधिक सबस्क्रिप्शन प्राप्त झाले होते. मात्र दुसऱ्या दिवशी IPO स्टॉकला 54 पट अधिक बोली प्राप्त झाली होती. 2 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचा रिटेल कोटा 89.41 पट अधिक सबस्क्राईब झाला होता. नेट अव्हेन्यू टेक्नॉलॉजी कंपनीने आपल्या IPO अंतर्गत एका लॉटमध्ये 8000 शेअर्स ठेवले होते. एक लॉट खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांना 1,44,000 रुपये जमा करावे लागले होते. रिटेल गुंतवणूकदार या IPO मध्ये कमाल एक लॉट खरेदी करू शकतात.
नेट अव्हेन्यू टेक्नॉलॉजी कंपनीने अँकर गुंतवणूकदारांना शेअर्स विकून 2.91 कोटी रुपये भांडवल उभारणी केली होती. तज्ञांच्या मते, ग्रे मार्केटमध्ये नेट अव्हेन्यू टेक्नॉलॉजी IPO स्टॉक 7 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहे. म्हणून या कंपनीचे शेअर्स 38 टक्के प्रीमियम किमतीवर सूचीबद्ध होऊ शकतात.
या कंपनीच्या IPO चा आकार 10.25 कोटी रुपये आहे. आपल्या IPO अंतर्गत नेट अव्हेन्यू टेक्नॉलॉजी कंपनी 56.96 लाख फ्रेश शेअर्स खुल्या बाजारात विकणार आहे. या कंपनीचे शेअर्स 12 डिसेंबर 2023 रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध केले जातील.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.