3 May 2024 2:17 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Adani Wilmar Share Price | कमाई करून घ्या! मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर Stocks To Buy | सुवर्ण संधी! तज्ज्ञांनी निवडले टॉप 5 शेअर्स, झटपट 45 टक्केपर्यंत कमाई होईल PSU Stocks | मल्टिबॅगर सरकारी कंपनीच्या शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'ओव्हरवेट' रेटिंग, पुढची टार्गेट प्राइस मालामाल करणार Yes Bank Share Price | येस बँक शेअरच्या टेक्निकल चार्टनुसार तेजीचे संकेत, मागील 6 महिन्यात 62% परतावा दिला Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरमध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून स्टॉक रेटिंग अपग्रेड BHEL Share Price | PSU शेअर सुसाट तेजीत, 1 वर्षात 258% परतावा दिला, अजून एक सकारात्मक अपडेट Tata Motors Share Price | 1 वर्षात 109% परतावा देणाऱ्या टाटा मोटर्स शेअर्समध्ये घसरण, पुढे नुकसान की फायदा?
x

कोकणात तेलशुद्धीकरण प्रकल्प नको म्हणणारी सेना पुन्हा पलटली? रायगड जिल्हा कोकणात नाही का?

Shivsena, Uddhav Thackeray

मुंबई : लोकसभा निवडणुकीत नाणार’मधील प्रस्तावित तेलशुद्धीकरण प्रकल्प कोकणच्या निसर्गाला हानिकारक असून शिवसेनेचा अशा प्रकल्पना विरोध असून असे प्रकल्प येऊ देणार नाही असं म्हणणारी शिवसेना लोकसभा निवडणूक संपताच आणि रायगडमधून अनंत गीते पराभूत होताच, पडद्याआडून वेगळ्याच हालचाली सूर झाल्या आहेत. सदर प्रकल्प हा कित्त्येक लाख करोड रुपयांचा असल्याने शिवसेनेला शांत करण्याच्या हालचाली भाजपकडून सुरु झाल्याचे वृत्त आहे.

प्रकल्प गुजरातला जाणार म्हणत हवा केली, मात्र निसर्गाला हानिकारक असे विनाशकारी प्रकल्प गुजरात सरकार स्वीकारणार नाही हे आधीच ठाऊक होते आणि संबधित सौदी कंपनीला प्रकल्प उभारणीचा खर्च नियंत्रणात ठेवण्यासाठी कोकणातील जागाच हवी होती. मध्यंतरी या निमीत्ताने मोदींच्या सौदीमधील नेत्यांशी भेटीगाठी झाल्या होत्या, तर सौदी सरकारने मोदींना देशातील सर्वोच्च पुरस्कार देखील दिला होता. दरम्यान हा प्रकल्प सौदी सरकारसाठी अत्यंत महत्वाचा आहे आणि भारत सरकार त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सर्वकाही करत आहे. त्यात महाराष्ट्रातील सत्तेत बसलेले मंत्री हे दिल्लीतील गुजराती भाजप नेत्यांची बुजगावणी असल्याने तो प्रकल्प येथेच लादला जाणार हे तितकंच सत्य आहे.

स्थानिकांच्या विरोधामुळे नाणार येथील प्रस्तावित तेलशुद्धीकरण प्रकल्प हा रायगड जिल्ह्यात हलवण्यात आला आहे. त्यामुळे आता रायगडमधून या प्रकल्पाला विरोध होऊ नये यासाठी भाजपनेत्यांनी वेळीच सावध पाऊलं उचलली आहेत. कारण केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी मातोश्री येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेत प्रकल्पाबाबत चर्चा केली आहे. स्थानिकांच्या विरोधामुळे मागील काही वर्षात नाणार येथील तेलशुद्धीकरण प्रकल्प चांगलाच वादात अडकला होता. परंतु आता हा प्रकल्प नाणार येथून हलवला असून रायगड जिल्ह्यात उभारला जाणार आहे. त्यामुळे आता तरी प्रकल्पात काही अडचणी येऊ नयेत म्हणून पेट्रोलियम मंत्री प्रधान यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेत चर्चा केली. या भेटी वेळी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई उपस्थित होते.

या भेटीमध्ये प्रधान यांनी प्रकल्पासाठी शिष्टाई केली असली तरी उद्धव ठाकरे यांनी मात्र आपली भूमिका स्पष्ट केली नसल्याचे समजते. नाणार येथील प्रकल्पास शिवसेनेचा स्पष्ट विरोध आहे. रायगडबाबत शिवसेनेने अद्याप आपली भूमिका स्पष्ट केली नाही. प्रधान यांच्या चर्चेतही उद्धव यांनी ऐकून घेण्याचीच भूमिका घेतल्याचे समजते. दरम्यान अरेबियाची अरमाको, इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम यांच्या सहभागातून उभारला जाणारा हा प्रस्तावित प्रकल्प जगातील सर्वात मोठा तेलशुद्धीकरण प्रकल्प असणार आहे. परंतु या प्रकल्पाला नाणार येथील स्थानिकांनी विरोध केला होता. तर स्थानिकांची बाजू घेत शिवसेनेने या प्रकल्पाच्या विरोधात भूमिका घेतली होती. या प्रकल्पामुळे कोकणातील निसर्गाला मोठा धोका असल्याचं म्हटलं जातं आहे आणि असे विनाशकारी प्रकल्प कोकणासारख्या निसर्गरम्य भागात करण्यामागील हट्ट म्हणजे सेनेला केव्हाही दाबता येते आणि स्थानिक भाजप नेते हे दिल्लीश्वरांची बुजगावणी आहेत.

 

Web Title: do not oppose for the refinery project at Raigard hence central petroleum minister visit to matoshri to meet Uddhav Thackeray.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)#udhav Thakarey(405)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x