
Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनीच्या शेअरमध्ये अफाट तेजी पाहायला मिळत आहे. टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स सध्या विक्रमी उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत आहेत. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स 6 टक्के वाढीसह 298.60 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
7 एप्रिल 2022 रोजी टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स 298 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या तुफानी रॅलीमध्ये टाटा पॉवर कंपनीचे एकूण बाजार भांडवल 94,885 कोटी रुपयेवर पोहचले आहे. आज गुरूवार दिनांक 7 डिसेंबर 2023 रोजी टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स 7.26 टक्के वाढीसह 315.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
मागील सहा महिन्यांत टाटा पॉवर कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 37 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरची किंमत 29.78 टक्के वाढली आहे. 2023 या वर्षात टाटा पॉवर कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 40.17 टक्के परतावा कमावून दिला आहे.
या स्टॉकचा बीटा 0.4 वर असून तो तो स्टॉकमध्ये खूपच कमी अस्थिरता दर्शवत आहे. तांत्रिकदृष्ट्या टाटा पॉवर कंपनीच्या स्टॉकचा रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स 70.8 अंकावर आहे. टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स 5 दिवस, 20 दिवस, 30 दिवस, 50 दिवस, 100 दिवस, 200 दिवसाच्या सरासरी किमतीच्या वर ट्रेड करत आहेत.
आज टाटा पॉवर कंपनीच्या शेअरने 300 रुपये किंमत ओलांडली आहे. तज्ञांच्या मते, अल्पावधीत हा स्टॉक 320 रुपये किंमत स्पर्श करू शकतो. सध्याच्या ट्रेंड नुसार टाटा पॉवर स्टॉकमध्ये 255 रुपये किमतीवर सपोर्ट पाहायला मिळत आहे. Tap2Trades फर्मच्या तज्ञांनी टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, या स्टॉकमध्ये 300 रुपये किमतीवर प्रतिकार पाहायला मिळत आहे. म्हणून तज्ञांनी सध्याच्या किमतीवर नफा वसुली करण्याचा सल्ला दिला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.