 
						Brightcom Share Price | मागील काही दिवसापासून ब्राइटकॉम ग्रुप कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत उसळी पहायला मिळत आहे. आज देखील या कंपनीचे शेअर्स मोठ्या प्रमाणात खरेदी केले जात आहेत. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ब्राइटकॉम ग्रुप कंपनीचे शेअर्स 20 टक्क्यांच्या वाढीसह 20.15 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
आज शुक्रवार दिनांक 8 डिसेंबर 2023 रोजी ब्राइटकॉम ग्रुप स्टॉक 10.22 टक्के वाढीसह 22.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील वर्षी डिसेंबर 2022 मध्ये ब्राइटकॉम ग्रुप स्टॉकने 36.90 रुपये ही 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली होती.
15 नोव्हेंबर 2023 रोजी ब्राइटकॉम ग्रुप लिमिटेड कंपनी संचालक मंडळाने कंपनीच्या नवीन ऑडिटरची नियुक्ती करण्याचा प्रस्ताव मंजूर केला होता. नुकताच ब्राइटकॉम ग्रुप कंपनीने तिमाहीआणि सहामाही निकाल दाखल करण्यासाठी सेबीकडून 40 दिवसांची मुदतवाढ मागितली आहे. आणि या विनंतीला कंपनीच्या संचालक मंडळाने मंजुरी दिली आहे.
ऑगस्ट 2023 मधे सेबीने ब्राइटकॉम ग्रुप कंपनी संबंधित प्रकरणात एक अंतरिम आदेश जारी केला होता. या आदेशान्वये ब्राइटकॉम गृप कंपनीचे दिग्गज गुंतवणूकदार शंकर शर्मा यांच्यासह 23 इतर गुंतवणुकदारांना कंपनीचे शेअर्स विकण्यावर बंदी घालण्यात आली होती.
सेबीच्या म्हणण्यानुसार, प्रेफरंस शेअर्सची तपासणी केल्यानंतर अंतरिम आदेश पारित करण्यात आला होता. सेबीने दिलेल्या माहितीनुसार ब्राइटकॉम ग्रुप कंपनीने प्रेफरंस शेअर्सच्या वाटपात हेराफेरी केली होती. म्हणून सेबीने ब्राइटकॉम ग्रुप कंपनीचे एमडी आणि चेअरमन सुरेश कुमार रेड्डी आणि सीएफओ नारायण राजू यांन पदावरून दूर करण्याचा आदेश दिला होता.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		