18 May 2024 10:59 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 19 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | तज्ज्ञांकडून PSU BEL शेअरला 'BUY' रेटिंग, यापूर्वी दिला 700% परतावा, खरेदीला ऑनलाईन गर्दी Bonus Shares | पटापट मल्टिबॅगर परतावा देतोय हा शेअर, फ्री बोनस शेअर्स जाहीर, संधी सोडू नका Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, यापूर्वी 245% परतावा दिला Malavya Raj Yog | मालव्य राजयोग 'या' 5 राशींच्या लोकांना मालामाल करणार, लाभस्थानी शुक्र ठरणार वरदान Titagarh Rail Systems Share Price | तज्ज्ञांकडून स्टॉकला 'Hold' रेटिंग, अल्पावधीत देणार 22% परतावा, खरेदीला गर्दी L&T Share Price | L&T कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी, वेळीच एंट्री घ्या
x

Bank of Maharashtra | बँक ऑफ महाराष्ट्र FD वार्षिक 6.50% व्याज, तर बँक ऑफ महाराष्ट्र शेअर 54.66% परतावा देतोय

Bank of Maharashtra

Bank of Maharashtra | सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ महाराष्ट्रने नुकतीच (ऑक्टोबर 2023) निवडक मुदतीसाठी फंडाच्या मार्जिनल कॉस्ट बेस्ड इंटरेस्ट रेटमध्ये (एमसीएलआर) 0.1 टक्क्यांनी वाढ केली आहे. त्यावेळी बँकेने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, वाहन, वैयक्तिक आणि गृहकर्ज अशा बहुतांश कर्जांसाठी व्याजदर निश्चित करण्यासाठी वापरला जाणारा एक वर्षाचा एमसीएलआर 8.60 टक्क्यांवरून 8.70 टक्के करण्यात आला आहे.

बँक ऑफ महाराष्ट्र : एफडी दरात 1.25 टक्क्यांपर्यंत वाढ
नवीन एमसीएलआर 11 ऑक्टोबर 2023 पासून लागू करण्यात आला आहे. दुसरीकडे, बँकेने आपल्या एफडी दरात 1.25 टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे. व्याजदरात केलेली वाढ बँकेने ठरवून दिलेल्या कालावधीनुसार एफडी आणि विशेष बचत योजनेवर लागू होईल, असे बँकेने एका निवेदनात म्हटले आहे. बँकेने 12 ऑक्टोबरपासून एफडीचे नवे दर लागू केले आहेत. 46 ते 90 दिवसांच्या ठेवीवरील व्याजदरात 1.25 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. यामुळे व्यक्ती आणि व्यवसाय क्षेत्राला अधिक बचत करण्यास प्रोत्साहन मिळेल.

एक वर्षाच्या ठेवीवर 6.50 टक्के व्याज
एक वर्षाच्या ठेवीवर बँक 6.50 टक्के व्याज देईल. एक वर्षापेक्षा जास्त कालावधीच्या ठेवींवरील व्याजदरात ०.२५ टक्क्यांची वाढ करून ते 6.25 टक्के करण्यात आले आहे. ज्येष्ठ नागरिकांना एफडीवर ०.५ टक्के अतिरिक्त व्याज मिळेल, असे बँकेकडून सांगण्यात आले. त्यांना २०० ते ४०० दिवसांच्या विशेष बचतीवर अनुक्रमे 7.00 ते 6.75 टक्के आकर्षक व्याज दिले जाणार आहे. बँकेने म्हटले आहे की, आकर्षक व्याजदर अल्पमुदतीच्या आणि दीर्घकालीन बचत ग्राहकांना उत्तम आणि जलद लाभ देतात.

वार्षिक आधारावर बँक ऑफ महाराष्ट्र शेअर ठरतोय FD पेक्षा फायद्याचा
एका बाजूला बँक ऑफ महाराष्ट्रच्या FD वर वार्षिक 6.50 टक्के ते 7.00 टक्के व्याज मिळत असताना दुसरीकडे बँक ऑफ महाराष्ट्र संबधित गुंतवणुकीचा अजून एक पर्याय वार्षिक आधारावर अनेक पटीने फायद्याचा ठरताना दिसतोय. कारण TYD आधारावर बँक ऑफ महाराष्ट्रचा शेअर गुंतवणूकदारांना तब्बल 54.66 टक्के परतावा देतं असल्याचं अधिकृत आकडेवारी सांगते आहे. सध्या बँक ऑफ महाराष्ट्राच्या शेअरची किंमत 47 रुपये 25 पैसे इतकी आहे.

Bank of Maharashtra

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Bank of Maharashtra Share Price NSE 16 December 2023.

हॅशटॅग्स

#Bank of Maharashtra(52)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x