4 May 2025 12:42 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
x

IRB Infra Share Price | शेअरची किंमत 41 रुपये! ऑर्डरबुक मजबूत असलेला IRB इन्फ्रा शेअर मल्टिबॅगर परताव्याच्या दिशेने सुसाट

IRB Infra Share Price

IRB Infra Share Price | IRB इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स कंपनीचे शेअर्स सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 6.34 टक्के वाढीसह 43.46 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र आज या कंपनीच्या शेअरमध्ये किंचित नफा वसुली पाहायला मिळत आहे. नुकताच IRB इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स कंपनीला एक मोठी ऑर्डर मिळाली होती.

त्यामुळे कंपनीचे शेअर्स मजबूत तेजीत वाढत होते. नुकताच भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण म्हणजेच NHAI ने IRB इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स कंपनीला एक मोठी ऑर्डर दिली होती. या ऑर्डरचे एकूण मुल्य 1,683 कोटी रुपये आहे. सध्या हा शेअर (१९ डिसेंबर २०२३) 1.18% घसरून 41.95 रुपयांवर ट्रेड करत आहे.

IRB इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीनुसार, NHAI ने IRB इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स कंपनीला 1,683 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर दिली आहे. या ऑर्डर अंतर्गत IRB इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स कंपनीला ग्वाल्हेर-झांसी आणि कोटा बायपास टोल, ऑपरेशन, देखभाल आणि इन्फ्रास्ट्रक्चर संबंधित काम देण्यात आले आहे. या प्रकल्पाचे एकूण मूल्य 1683 कोटी रुपये असून त्याचा एकूण कालावधी 20 वर्ष आहे.

या नवीन ऑर्डरची पूर्तता झाल्यास IRB इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स कंपनीची मालमत्ता टोल ऑपरेट ट्रान्सफर क्षेत्रात 38 टक्केच्या वाढीसह 77,000 कोटीपर्यंत वाढेल. या नवीन प्रकल्पामध्ये IRB इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स कंपनीला NH44 वरील ग्वाल्हेर-झांसी विभाग आणि NH76 वरील कोटा बायपास विभागासह 110 किमी अंतरावर टोलिंग आणि ऑपरेशन्स, देखभाल संबंधित काम देण्यात आले आहे.

मागील पाच ट्रेडिंग सेशनमध्ये IRB इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स कंपनीचे शेअर्स 6.06 टक्के मजबूत झाले आहेत. तर मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 14 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील सहा महिन्यांत IRB इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांचे पैसे 60 टक्के वाढवले आहेत. तर YTD आधारे IRB स्टॉक 37 टक्के मजबूत झाला आहे. IRB इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स कंपनीचे एकूण बाजार भांडवल 25,859 कोटी रुपये आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IRB Infra Share Price NSE 19 December 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

IRB infra Share Price(72)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या