 
						Avanti Feeds Share Price | अवंती फीड्स कंपनीच्या शेअर्सने मागील 10 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना बंपर कमाई करून दिली आहे. मागील दहा वर्षात अवंती फीड्स कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 5,000 टक्के परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही 10 वर्षांपूर्वी अवंती फीड कंपनीच्या शेअरमध्ये 10,000 रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 5 लाख रुपये झाले असते.
मागील 5 वर्षात अवंती फीड्स कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 55 टक्के नकारात्मक परतावा दिला आहे. मागील तीन वर्षात या कंपनीच्या शेअरची किंमत फक्त सरासरी 18 टक्के वाढली आहे. आज मंगळवार दिनांक 26 डिसेंबर 2023 रोजी अवंती फीड्स स्टॉक 0.73 टक्के वाढीसह 401 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
अवंती फीड्स कंपनीचे एकूण बाजार भांडवल 5,000 कोटीं रुपये पेक्षा जास्त आहे. ही कंपनी भारतातील सर्वात मोठ्या सीफूड कंपन्यांपैकी एक मानली जाते. अवंती फीड्स ही कंपनी एकसंध पुरवठा साखळी आणि फार्म-टू-फोर्क मॉडेलसह जलसंवर्धन फार्म, फीड मिल, हॅचरी आणि प्रक्रिया संयंत्रांच्या अनुलंब एकात्मिक पायाभूत सुविधांचा वापर करून व्यवसाय करत आहे.
या कंपनीचा ट्रेलिंग बारा महिने आधारावर EPS 21.61 आहे. सध्या या कंपनीच्या शेअरचा PB प्रमाण 3 आहे. सार्वजनिक गुंतवणूकदारांनी अवंती फीड्स कंपनीचे 56.72 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. तर उर्वरित 43.28 टक्के भाग भांडवल कंपनीच्या प्रवर्तकांनी धारण केले आहे.
सार्वजनिक भागधारकांच्या एकूण स्टॉक होल्डिंगपैकी म्युच्युअल फंडांनी 8.4 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. तर परकीय पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी या कंपनीचे 9 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत अवंती फीड्स कंपनीने फक्त 2,898 कोटी रुपये कमाई केली होती.
मागील आर्थिक वर्षातील याच कालावधीत कंपनीने 2,930 कोटी रुपये कमाई केली होती. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत कंपनीचा PBT वाढून 270 कोटी रुपयेवर पोहचला होता. मागील 6 वर्षांपासून अवंती फीड्स कंपनीचे शेअर्स कन्सोलिडेशनमध्ये आहेत. तर कंपनीचा पीबी देखील 2 च्या जवळ असून पीई प्रमाण 17 च्या खाली आहे. पुढील काही दिवसात हा स्टॉक 720 रुपये किंमत स्पर्श करण्याची शक्यता आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		