10 May 2024 7:13 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 10 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 10 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, 1 वर्षात दिला 290% परतावा, कंपनीबाबत आली मोठी अपडेट Spright Agro Share Price | 65 पैशाच्या शेअरची कमाल! अवघ्या 1 वर्षात 5000% परतावा दिला, खरेदीला आजही स्वस्त Gold Rate Today | गुड-न्यूज! आज अक्षय्य तृतीयेच्या 1 दिवस आधी सोन्याचा भाव धडाम, पटापट नवे दर तपासून घ्या Wipro Share Price | विप्रो शेअर पुढे तेजीत येणार, कंपनीबाबत सकारात्मक बातमीने गुंतवणूकदारांना फायदा होणार MRPL Share Price | मल्टिबॅगर MRPL शेअर 24 टक्क्याने घसरणार? स्टॉकचार्टने दिले संकेत, तज्ज्ञांनी काय म्हटलं?
x

Suzlon Share Price | किंमत 38 रुपये! सुझलॉन शेअर्सची खरेदी वेगात सुरु, ऑर्डरबुक पाहून मल्टिबॅगर परतावा मिळण्याचे संकेत मिळाले

Suzlon Share Price

Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी या अक्षय ऊर्जा सोल्यूशन प्रदाता कंपनीचे शेअर्स जबरदस्त तेजीत वाढत आहेत. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 4 टक्के वाढीसह 38.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरमध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, सुझलॉन कंपनीला अप्रवा एनर्जी कंपनीकडून 300 मेगावॅट क्षमतेच्या पवन ऊर्जा प्रकल्पाची उभारणी करण्याचे काम देण्यात आले आहे. आज शुक्रवार दिनांक 29 डिसेंबर 2023 रोजी सुझलॉन एनर्जी स्टॉक 0.39 टक्के वाढीसह 38.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

सुझलॉन एनर्जी कंपनीने आपल्या निवेदनात माहिती दिली आहे की, सुझलॉन एनर्जी कंपनीला कर्नाटकातील साइटवर हायब्रिड लॅटिस ट्युब्युलर टॉवर आणि 100 विंड टर्बाइन जनरेटर स्थापन करण्याचे काम देण्यात आले आहे. यासह सुझलॉन एनर्जी कंपनीला अप्रवा एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने 300 मेगावॅट क्षमतेचा पवन ऊर्जा प्रकल्प उभारण्याचे काम दिले आहे.

सुझलॉन एनर्जी कंपनीने अप्रवा कंपनीसोबत पूर्वी देखील काम केले होते. अप्रवा एनर्जी कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकांनी निवेदनात म्हंटले आहे की, “आम्ही सुझलॉन एनर्जी कंपनीसोबत दीर्घ भागीदारीची अपेक्षा करतो. आणि त्यांच्या कौशल्याचा, समृद्ध अनुभवाचा आणि सर्वोत्तम श्रेणीतील स्वदेशी उपायांचा आमच्या कंपनीला खूप फायदा होईल.”

सुझलॉन एनर्जी कंपनीला एकामागून एक मोठमोठ्या ऑर्डर प्राप्त होत आहेत. बुधवारी पुणेस्थित महिंद्रा सस्टेन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने सुझलॉन एनर्जी कंपनीला 100.8 मेगावॅट क्षमतेचा प्रकल्प उभारण्याची ऑर्डर दिली आहे. या ऑर्डर अंतर्गत 2. 1 मेगावॅट क्षमतेचे 48 विंड टर्बाइन पुरवठा करायचे आहे. हा पवन ऊर्जा प्रकल्प महाराष्ट्रात उभारला जाणार आहे. यापूर्वी, सुझलॉन कंपनीला केपी समूहाने देखील 193.2 मेगावॅट क्षमतेचा पवन ऊर्जा प्रकल्प उभारण्याचे कॉन्ट्रॅक्ट दिले आहे.

मागील पाच दिवसांत सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सची किंमत 11 टक्के मजबूत झाली आहे. मागील सहा महिन्यांत सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 160 टक्के परतावा कमावून दिला आहे. या काळात कंपनीच्या शेअर्सची किंमत 14 रुपयेवरून वाढून सध्याच्या किमतीवर पोहोचली आहे.

YTD आधारे या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 258 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 270 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 51,862.97 कोटी रुपये आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Suzlon Share Price NSE Live 29 December 2023.

हॅशटॅग्स

Suzlon Share Price(136)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x