17 May 2024 1:19 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | अबब! जबरदस्त म्युच्युअल फंड योजना, 10,000 रुपयांच्या SIP वर 9.57 कोटी रुपये परतावा दिला Gold Rate Today | टेन्शन वाढलं! आज सोन्याचा भाव अजून महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या My EPF Money | पगारदारांनो! तुमच्या खात्यातही पैसे जमा झाले असतील तर पटापट तपासून घ्या, नियम बदलला Shukra Rashi Parivartan | 'या' 3 नशीबवान राशीत तुमची राशी आहे का? शुक्र राशी परिवर्तन ठरणार अत्यंत भाग्यशाली SBI Mutual Fund | पगारदारांनो! या खास योजना तुम्हाला अल्पावधीत 22 लाख रुपयेपर्यंत परतावा देतील, यादी सेव्ह करा Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 17 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Zen Technologies Share Price | हा स्टॉक खरेदी करा, अवघ्या 4 वर्षात 1252% परतावा दिला, ऑर्डरबुक अजून मजबूत झाली
x

Apollo Micro Systems Share Price | शेअरची किंमत 113 रुपये, अवघ्या 3 वर्षात दिला 2800 टक्के परतावा, वेळीच खरेदी करावा?

Apollo Micro Systems Share Price

Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम कंपनीचे शेअर्स 2023 च्या शेवटच्या ट्रेडिंग सेशनमध्ये तेजीत वाढत होते. शुक्रवारी अपोलो मायक्रो सिस्टीम्स कंपनीच्या शेअर्समध्ये पाच टक्के उसळी पाहायला मिळाली आणि अल्पावधीत या शेअर्सची किंमत 113.95 रुपये किमतीवर जाऊन पोहोचली होती. अपोलो मायक्रो सिस्टीम ही संरक्षण आणि इतर अनेक महत्त्वाच्या क्षेत्रांत व्यवसाय करणारी कंपनी आहे.

या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 161.70 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 24.99 रुपये होती. शुक्रवार दिनांक 29 डिसेंबर 2023 रोजी अपोलो मायक्रो सिस्टीम स्टॉक 4.97 टक्के वाढीसह 113.95 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

अपोलो मायक्रो सिस्टीम या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 3230 कोटी रुपये आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीचे शेअर्स 46 रुपये या नीचांक किंमत पातळीवरून तब्बल 120 टक्क्यांनी वाढले आहेत. 2023 या वर्षात अपोलो मायक्रो सिस्टीम स्टॉक 30.57 रुपये या नीचांकी किमतीवरून 276 टक्के मजबूत झाला आहे.

मागील 1 वर्षात अपोलो मायक्रो सिस्टीम कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 27.80 रुपये या नीचांक पातळीवरून 310 टक्के नफा कमावून दिला आहे. कोरोना संकटाच्या काळात 27 मार्च 2020 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.43 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर या किमतीवरून हा स्टॉक आता 2800 टक्के वाढला आहे.

अपोलो मायक्रो सिस्टीम या कंपनीची स्थापना करुणाकर रेड्डी यांनी 1985 साली केली होती. या कंपनीने सुरुवातीच्या काळात ISRO साठी डिझाइन सेवा प्रदान करण्याचे काम सुरू केले होते. आता ही कंपनी संपूर्ण प्लॅटफॉर्म स्तरावरील सेवा प्रदान करण्याचे काम करते. अपोलो मायक्रो सिस्टीम ही कंपनी समुद्र तळावरील खाणींच्या कामात देखील अग्रेसर मानली जाते. अपोलो मायक्रो सिस्टीम कंपनी रेल्वे, ऑटोमोटिव्ह आणि होमलँड सिक्युरिटी मार्केटला आपल्या सेवा प्रदान करते.

या कंपनीच्या विविध आधुनिक क्रियाकलापांमध्ये क्षेपणास्त्रे, नौदल, टॉर्पेडो आणि पाण्याखालील खाणी देखील सामील आहेत. पुढील 12 महिन्यांत अपोलो मायक्रो सिस्टीम कंपनी आपला उत्पादन युनिट विस्तार 55,000 स्क्वेअर फुटांवरून वाढवून 3.3 लाख स्क्वेअर फुट करणार आहे. सध्या कंपनीकडे DRDO मे दिलेल्या अनेक ऑर्डर प्रलंबित आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Apollo Micro Systems Share Price NSE Live 30 December 2023.

हॅशटॅग्स

Apollo Micro Systems Share Price(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x