2 May 2024 7:43 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 02 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 02 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Trent Share Price | टाटा ग्रुपच्या शेअरने 6 महिन्यात दिला 110 टक्के परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर NMDC Share Price | मल्टिबॅगर एनएमडीसी शेअर एका महिन्यात बक्कळ कमाई करून देईल, फायदा घेणार? NTPC Share Price | NTPC सहित हे 4 पॉवर शेअर्स तुफान तेजीत येणार, लवकरच करणार मालामाल Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव मजबूत धडाम झाला, तुमच्या शहरातील घसरलेले नवे दर तपासून घ्या Stocks To Buy | कमाईची मोठी संधी! अवघ्या 87 रुपये किमतीचा शेअर अल्पावधीत 30 टक्के परतावा देईल
x

मिलिंद देवरा यांचा मुंबई काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा

congress, milind deora, sanjay nirupam, rahul gandhi

मुंबई : मुंबई काँग्रेसचे विद्यमान अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचे वृत आहे. दरम्यान सदर राजीनामा देताना त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीपर्यंत मुंबई शहर युनिटचे निरीक्षण करण्यासाठी दिल्लीतील 3 वरिष्ठ नेत्यांच्या सामूहिक नेतृत्वाची तात्पुरती स्थापना करण्याची शिफारस देखील राजीनामा देण्यापूर्वी केली आहे.

काँग्रेसमध्ये पुढील राष्ट्रीय स्तरावरील भूमिका स्वीकारण्यासाठी देवरा दिल्लीत जाऊ शकतात असं म्हटलं जात आहे. हा राजीनामा संदर्भातील एक पत्र नुकतेच देवरा यांनी दिल्लीत वरिष्ठ पक्षश्रेष्ठींकडे सुपुर्द केल्याची माहिती एएनआय’ने दिली आहे. महाराष्ट्रात काँग्रेससाठी भारतीय जनता पक्ष-शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या प्रभावाला खीळ घालणं हे काँग्रेससाठी एक मोठे आव्हान आहे, असे त्यांनी राजीनामा देताना नमुद केले आहे.

देवरा यांच्या कार्यालयाच्या निवेदनात म्हटले आहे की, २६ जून रोजी राहुल गांधी यांना दिल्लीत भेटल्यानंतर लवकरच पद सोडण्याची इच्छा व्यक्त केली. देवराच्या कार्यालयातून आलेल्या निवेदनात म्हटले आहे, “हे अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सरचिटणीस मल्लिकार्जुन खरगे आणि के.सी. वेणुगोपाल यांना सांगण्यात आले आहे,” हे पाऊल एआयसीसीचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या राजीनामा देण्याबरोबरच एकनिष्ठा आणि सामूहिक जबाबदारीची अभिव्यक्ती म्हणून उचलण्यात आले. अध्यक्ष म्हणून राजीनामा देताना देवरा यांनी ४ जुलै रोजी राहुल गांधी यांच्या मुंबई भेटीची व्यवस्था केली.

हॅशटॅग्स

#Congress(527)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x