
Yes Bank Share Price | येस बँकेच्या शेअरमध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. नवीन वर्षात शेअर बाजाराची सुरुवात किंचित घसरणीसह झाली मात्र येस बँकेच्या शेअर्सवर या घसरणीचा कोणताही परिणाम झाला नाही. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये येस बँकेचे शेअर्स तेजीत वाढत होते. मागील तीन दिवसांपासून येस बँकेचे शेअर्स मोठ्या प्रमाणात खरेदी केले जात आहेत.
कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये येस बँकेचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 23.71 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 3 जानेवारी 2024 रोजी येस बँक स्टॉक 0.22 टक्के वाढीसह 23.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील तीन दिवसांत येस बँक स्टॉक 20.85 रुपये किमतीवरून वाढून 23.25 रुपये किमतीवर पोहचला आहे.
तज्ञांच्या मते, येस बँकेने एनपीए पोर्टफोलिओ विक्रीनंतर सिक्युरिटी रिसीट पोर्टफोलिओमधील एका ट्रस्टकडून 150 कोटी रुपये मिळाल्याची माहिती दिली आहे. त्यानंतर येस बँकेच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळाली आहे. तज्ञांच्या मते, येस बँक स्टॉक पुढील काळात 30 रुपये किमतीवर जाऊ शकतो. मात्र गुंतवणूक करताना तज्ञांनी या स्टॉकवर 21 रुपये किमतीवर स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला दिला आहे.
येस बँकेच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळत आहे, कारण येस बँकेने आपल्या एनपीए पोर्टफोलिओच्या विक्रीच्या संदर्भात एका ट्रस्टकडून 150 कोटी रुपये मिळणार असल्याची बातमी दिली आहे. आता विविध कंपन्या आपल्या तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर करत आहेत.
तज्ञांच्या मते, येस बँकेचे शेअर्स देखील अल्पावधीत 30 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. येस बँकेचे शेअर्स आपल्या टेक्निकल चार्टवर मजबूत वाढीचे संकेत देत आहेत. म्हणून तज्ञांनी येस बँक स्टॉकवर 30 रुपये टारगेट प्राइस साठी 21 रुपये किमतीवर स्टॉप लॉस लावून पैसे लावण्याचा सल्ला दिला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.