18 May 2024 12:13 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Income Tax on Salary | नोकरदारांनो! ITR करताना 'या' 10 चुका टाळा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा Post Office Interest Rate | तुमच्या कुटुंबासाठी 'या' 3 पोस्ट ऑफिस योजना वरदान ठरतील, फायदे जाणून घ्या SBI Mutual Fund | पगारदारांसाठी खास SIP योजना नोट करा, महिना बचत देईल 1 कोटी 4 लाख रुपये परतावा Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 18 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Titagarh Rail Systems Share Price | अवघ्या 4 वर्षात दिला 3700% परतावा, तज्ज्ञांकडून शेअरला ओव्हरवेट रेटिंग, फायदा घ्या LIC Share Price | एलआयसीला सर्वात मोठा दिलासा, शेअरमध्ये सुसाट तेजी, स्टॉक प्राईस 1000 रुपयांच्या जवळ NCC Share Price | NCC स्टॉक ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाहीर
x

Vikas Lifecare Share Price | गरिबांना सुद्धा खरेदीला परवडेल असा 5 रुपयाचा शेअर, खरेदीनंतर संयमाने आयुष्य बदलून जाईल

Vikas Lifecare Share Price

Vikas Lifecare Share Price | विकास लाइफकेअर कंपनीचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये किंचित घसरणीसह ट्रेड करत होते. मात्र आज या कंपनीचे शेअर्स जबरदस्त तेजीत वाढत आहेत. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये विकास लाइफकेअर कंपनीचे शेअर्स 6 टक्क्यांच्या वाढीसह 5.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

विकास लाइफ केअर लिमिटेड या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 747 कोटी रुपये आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 7.05 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 2.70 रुपये होती. आज बुधवार दिनांक 3 जानेवारी 2024 रोजी विकास लाइफकेअर स्टॉक 0.96 टक्के वाढीसह 5.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

विकास लाइफ केअर लिमिटेड कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीनुसार कंपनीने सोमवार दिनांक 1 जानेवारी 2024 रोजी संचालक मंडळाची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत कंपनीने क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल प्लेसमेंटद्वारे पहिल्या टप्प्यात 50 कोटी रुपये भांडवल उभारण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे.

विकास लाइफ केअर लिमिटेड कंपनी QIP च्या दुसऱ्या टप्प्यात देखील 50 कोटी रुपये भांडवल उभारणी करणार आहे. पात्र संस्थात्मक प्लेसमेंटची ऑफर उघडण्याची तारीख 1 जानेवारी 2024 असेल. विकास लाइफकेअर कंपनीने 5.02 रुपये प्रति इक्विटी शेअरच्या फ्लोअर प्राइसवर पात्र संस्थात्मक प्लेसमेंटद्वारे भांडवल उभारणीला मंजुरी दिली आहे.

विकास लाइफकेअर लिमिटेड कंपनीच्या संचालक मंडळाने QIP च्या फ्लोअर प्राईसवर 5 टक्के सूट देण्याचा विचार केला होता. विकास लाइफ केअर लिमिटेड ही कंपनी मागील तीन दशकांपासून विषमुक्त विशेष रसायन क्षेत्रात व्यवसाय करते. विकास लाइफकेअर कंपनी आपल्या जगभरातील ग्राहक वर्गाला विशेष रासायन संबंधित सेवा उपाय प्रदान करते. विकास लाइफ केअर लिमिटेड कंपनीची उत्पादने अन्न आणि पिण्याचे पाणी यामध्ये देखील वापरली जातात.

विकास लाइफ केअर आणि इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड या दोन्ही कंपन्यांनी संयुक्त उपक्रम अंतर्गत 110 कोटी रुपये गुंतवणुक करून एकात्मिक स्मार्ट मीटर उत्पादन युनिट उभारण्याची घोषणा केली होती. मागील काही काळापासून परकीय गुंतवणूकदारांनी देखील विकास लाइफ केअर लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे.

मागील वर्षी ऑगस्ट 2023 मध्ये, एजी डायनॅमिक फंड लिमिटेड आणि सायप्रस ग्लोबल आर्बिट्रेज फंड या गुंतवणुकदार संस्थांनी विकास लाइफ केअर या स्मॉल कॅप कंपनीचे शेअर्स खरेदी करून मोठी गुंतवणूक केली होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Vikas Lifecare Share Price NSE Live 03 January 2024.

हॅशटॅग्स

Vikas Lifecare Share Price(37)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x