21 May 2024 12:30 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 21 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 21 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या RVNL Share Price | 1660 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीला ऑनलाईन गर्दी, पुढेही मालामाल करणार Patel Engineering Share Price | 58 रुपयांचा शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल 37 टक्केपर्यंत परतावा HAL Share Price | तज्ज्ञांचा HAL शेअर्स खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला, बक्कळ कमाई होईल, किती टक्के परतावा मिळेल? NMDC Share Price | PSU NMDC स्टॉकला तज्ज्ञांची 'BUY' रेटिंग, अल्पावधीत मोठी कमाई, किती फायदा होईल? Tata Motors Share Price | तज्ज्ञांकडून टाटा मोटर्स शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राइस जाहीर
x

Reliance Power Share Price | शेअरची किंमत 31 रुपये, 2 दिवसात 22% परतावा दिला, यापूर्वी अल्पावधीत 2600% परतावा दिला

Reliance Power Share Price

Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स मागील काही दिवसांपासून हिरव्या निशाणीवर ट्रेड करत आहेत. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स 20 टक्क्यांच्या वाढीसह 31.15 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर दिवसा अखेर या कंपनीचे शेअर्स 19.38 टक्क्यांच्या वाढीसह 30.99 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

आज देखील रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळाली आहे. रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स आपल्या सर्वकालीन उच्चांक किंमत पातळीच्या तुलनेत 99 टक्के घसरले होते, आणि 1.13 रुपये किमतीवर स्थिरावले होते. आता या नीचांक किमतीच्या तुलनेत रिलायन्स पॉवर स्टॉक 2600 टक्के मजबूत झाला आहे. आज शुक्रवार दिनांक 5 जानेवारी 2024 रोजी रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स 2.63 टक्के वाढीसह 31.20 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 9.05 रुपये होती. आज सर्वकालीन उच्चांक किंमत पातळीवरून 99 टक्के घसरल्यानंतर या शेअर्समध्ये पुन्हा 2600 टक्के वाढ पाहायला मिळाली होती. मागील 4 वर्षात रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स 1.13 रुपयेवरून वाढून 30 रुपये किमतीच्या पार गेले आहेत. रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये ही वाढ मोठ्या घसरणीनंतर पाहायला मिळाली आहे.

23 मे 2008 रोजी रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स 274.84 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 27 मार्च 2020 रोजी रिलायन्स पॉवर स्टॉक 1.13 रुपये किमतीवर पडला होता. यानंतर रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये पुन्हा झपाट्याने सुधारणा पाहायला मिळाली.

रिलायन्स पॉवर कंपनीचे एकूण बाजार भांडवल 11000 कोटी रुपयेच्या पार गेले आहे. मागील 3 वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 775 टक्के परतावा कमावून दिला आहे. 1 जानेवारी 2021 रोजी रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स 3.49 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 4 जानेवारी 2024 रोजी रिलायन्स पॉवर स्टॉक 30.99 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.

मागील एका वर्षात रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्सची किंमत 109 टक्के वाढली आहे. 4 जानेवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 14.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आता हा स्टॉक 30 रुपये किमतीच्या पार गेला आहे. मागील 6 महिन्यांत रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 105 टक्के परतावा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Reliance Power Share Price NSE Live 5 January 2024

हॅशटॅग्स

Reliance Power Share Price(53)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x