
Jyoti CNC Automation IPO | नवीन वर्षाची सुरुवात झाली आहे. आणि यावर्षातील पहिला IPO गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. या कंपनीचे नाव आहे, ज्योती CNC ऑटोमेशन. सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर तुम्ही ज्योती CNC ऑटोमेशन कंपनीच्या IPO मध्ये पैसे लावू शकता. या कंपनीचा IPO 8 जानेवारी 2024 रोजी अँकर गुंतवणूकदारांसाठी खुला केला जाईल. ग्रे मार्केटचा आढावा घेणाऱ्या तज्ञांच्या मते, या कंपनीचे IPO शेअर्स ग्रे मार्केटमध्ये धुमाकूळ घालत आहेत.
ज्योती CNC ऑटोमेशन कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअर्सची किंमत बँड 315 रुपये ते 331 रुपये प्रति शेअर ठरवली आहे. ज्योती CNC ऑटोमेशन कंपनीने आपल्या IPO साठी एका लॉटमध्ये 45 शेअर्स ठेवले आहेत. गुंतवणूकदारांना एक लॉट खरेदी करण्यासाठी किमान 14,895 रुपये जमा करावे लागतील. किरकोळ गुंतवणूकदार या कंपनीच्या IPO मध्ये कमाल 13 लॉट खरेदी करू शकतात. ज्योती CNC ऑटोमेशन कंपनीने आपल्या IPO मध्ये कंपनीच्या कर्मचाऱ्यांना प्रति शेअर 15 रुपये सूट दिली आहे.
ज्योती CNC ऑटोमेशन कंपनीचा IPO 11 जानेवारी 2024 पर्यंत गुंतवणुकीसाठी खुला असेल. ग्रे मार्केटमध्ये ज्योती CNC ऑटोमेशन कंपनीचे शेअर्स 85 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहेत. तज्ञांच्या मते, या कंपनीचा शेअर 416 रुपये किमतीवर सूचीबद्ध होऊ शकतो. पहिल्याच दिवशी गुंतवणुकदारांना 25 टक्क्यांपेक्षा जास्त नफा मिळू शकतो. ज्योती CNC ऑटोमेशन कंपनीमध्ये प्रवर्तकांनी 72.66 टक्के भाग भांडवल धारण केले आहे.
या कंपनीच्या आयपीओचा एकूण आकार 1000 कोटी रुपये आहे. या IPO अंतर्गत कंपनी 3.02 कोटी फ्रेश शेअर्स इश्यू करणार आहे. ज्योती CNC ऑटोमेशन कंपनीने आपल्या IPO मधील 10 टक्के वाटा रिटेल गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवला आहे. तर 75 टक्के वाटा कंपनीने QI साठी राखीव ठेवला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.