15 May 2024 6:06 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 15 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEML Share Price | सरकारी कंपनीचा स्टॉक रॉकेट तेजीत, 2 दिवसात 18% परतावा दिला, खरेदीला ऑनलाईन गर्दी LIC Share Price | PSU LIC स्टॉक तेजीत वाढणार, तज्ज्ञांकडून स्ट्राँग बाय रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर NMDC Share Price | NMDC सहित हे 5 शेअर्स मोठा परतावा देणार, मिळेल 35 टक्केपर्यंत परतावा L&T Share Price | L&T सहित हे 10 शेअर्स 40 टक्केपर्यंत परतावा देतील, अल्पावधीत कमाईची मोठी संधी Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Polycab Share Price | तज्ज्ञांकडून पॉलीकॅब इंडिया स्टॉकवर 'बाय' रेटिंग, 953% परतावा देणारा शेअर तेजीत वाढणार
x

Reliance Home Finance Share Price | शेअरची किंमत 5 रुपये, अवघ्या 1 महिन्यात दिला 132% परतावा, खरेदी करावा का?

Reliance Home Finance Share Price

Reliance Home Finance Share Price | रिलायन्स होम फायनान्स कंपनीचे शेअर्स मागील काही दिवसापासून सातत्याने अप्पर सर्किट हीट करत होते. मात्र आज या कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त नफा वसुली झाली आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये रिलायन्स होम फायनान्स कंपनीचे शेअर्स 5 टक्के अप्पर सर्किटसह 6.22 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज हा स्टॉक मोठ्या प्रमाणात घसरला आहे.

मागील एका महिन्यात रिलायन्स होम फायनान्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 132 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज बुधवार दिनांक 10 जानेवारी 2024 रोजी रिलायन्स होम फायनान्स स्टॉक 1.72 टक्के घसरणीसह 5.70 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.

रिलायन्स होम फायनान्स कंपनी आपले डिसेंबर 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल करणार आहे. यापूर्वी शेअरमध्ये जोरदार खरेदी सुरू झाली होती. मागील वर्षी रिलायन्स कॅपिटल कंपनीने रिलायन्स होम फायनान्स कंपनीमधील आपले 45 टक्के भागभांडवल 54 कोटी रुपये किमतीला खुल्या बाजारात विकले होते. रिलायन्स कॅपिटल ही कंपनी देखील अनिल अंबानी यांच्या मालकीची कंपनी आहे.

मागील काही महिन्यांपासून रिलायन्स होम फायनान्स कंपनीचा स्टॉक तुफान तेजीत वाढत होता. अवघ्या एका आठवड्यात या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 27 टक्के परतावा दिला होता. मते दोन आठवड्यात शेअर्सची किंमत तब्बल 61 टक्क्यांनी वाढली होती.

मागील तीन महिन्यांत रिलायन्स होम फायनान्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 176 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 5 वर्षांत रिलायन्स होम फायनान्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 85 टक्क्यांनी वाढवले होते. पाच वर्षांपूर्वी रिलायन्स होम फायनान्स स्टॉक 40 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. तर 2017 मध्ये या कंपनीचे शेअर्स 108 रुपये किमतीवर ट्रेड करत होत. मात्र त्यानंतर या कंपनीच्या शेअर्समध्ये तब्बल 95 टक्के घसरण झाली होती.

रिलायन्स होम फायनान्स कंपनीचे एकूण बाजार भांडवल 301.40 कोटी रुपये आहे. या कंपनीची स्थापना 2008 साली झाली होती. ही कंपनी मुख्यतः आपल्या ग्राहकांना परवडणारी गृहकर्ज, उच्च मूल्याची गृहकर्ज, मालमत्तेवर कर्ज, बांधकाम वित्त, मालमत्ता सेवा आणि मालमत्ता मूल्यांकन सेवा प्रदान करण्याचा व्यवसाय करते.

सप्टेंबर 2023 च्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, रिलायन्स होम फायनान्स कंपनीमध्ये बिगर-संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 97.31 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. विमा कंपन्यानी या कंपनीचे 1.55 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत. आणि कंपनीच्या प्रवर्तकांनी रिलायन्स होम फायनान्स कंपनीचे एकूण 0.74 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत. FII कडे रिलायन्स होम फायनान्स कंपनीचे 0.39 टक्के भाग भांडवल आहेत. तर DII कडे या कंपनीचे एकूण 0.02 भाग भांडवल आहे.

सप्टेंबर 2023 तिमाहीत रिलायन्स होम फायनान्स कंपनीची विक्री 99.78 टक्के घटली होती. आणि कंपनीने फक्त 016 कोटीची निव्वळ विक्री नोंदवली होती. मागील वर्षी या कंपनीची एकूण विक्री 72.27 कोटी रुपये होती. तर कंपनीने सप्टेंबर तिमाहीत 0.67 कोटी रुपये निव्वळ तोटा नोंदवला होता.

मागील वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत कंपनीच्या नफ्यात 99.59 टक्के ची घट झाली आहे. रिलायन्स होम फायनान्स कंपनीचा EBITDA 0.67 कोटी रुपये नकारात्मक आहे. तर मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीचा EBITDA 33.38 कोटी होता. जो आता 102.01 टक्के घटला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Reliance Home Finance Share Price NSE Live 10 January 2024.

हॅशटॅग्स

Reliance Home Finance Share Price(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x