मुंबई: केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मचा अर्थसंकल्प मांडण्यात अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी संसदेत मांडल्यापासून शेअर बाजारात मोठी पडझड सूर आहे आणि त्यामुळे गुंतवणूकदारांची झोप उडाली आहे. अर्थसंकल्पानंतर शेअर बाजारात दोन दिवसांपासून मोठी घसरण झाली असून गुंतवणूकदारांचे तब्बल ५ लाख कोटी रुपये पाण्यात बुडाले आहेत. त्यामुळे गुंतवणूकदार अत्यंत चिंतेत असल्याचं वृत्त आहे.

शुक्रवारी मुंबई शेअर बाजार अर्थात बीएसईच्या यादीवरील कंपन्यांचे एकूण बाजरी भांडवल १५३.५८ लाख कोटी एवढं होते. मात्र आज म्हणजे सोमवारी त्यात मोठ्या प्रमाणात पडझड झाली असून हा आकडा १४८.४३ लाख कोटीवर येऊन ठेपला आहे. याप्रमाणे मागील २ दिवसात एकूण ५ लाख कोटींपेक्षा अधिक नुकसान गुंतवणूकदारांना सोसावं लागलं आहे.

दरम्यान, आज शेअर बाजाराचा निर्देशांक म्हणजे सेन्सेक्स ७५० अंकांनी खाली घसरून ३८,७२०.५७ वर स्थिरावला. शेअर बाजाराच्या ३० पैकी २५ तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या एकूण ५० पैकी ४४ शेअर्समध्ये घसरण दिसून आली. तर निफ्टी २५२.५५ अंकाने घसरून ११,५५८.६० वर स्थिरावला आहे. दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर शेअर मार्केट आज चांगली कामगिरी करेल अशी गुणवणूकदारांना अपेक्षा होती. मात्र तसं काही न घडत शेअर मार्केटमध्ये सेन्सेक्स अजून काही अंकांनी घसरला आणि गुंतवणूक दरांनी डोक्याला हातच लावला. आज बाजार खुला होताच सेन्सेक्स ३७ अंकांनी तर निफ्टी ४०.२५ अंकांनी कोसळला.

दरम्यान, पीएनबी बँकेत भूषण पाव अँड स्टील या कंपनीचा तब्बल ३ हजार ८०० कोटी रूपयांचा महाघोटाळा समोर आला आहे. पीएनबीने याची माहिती रिझर्व्ह बँकेला देखील दिली आहे. हा महाघोटाळा अधिकृतरीत्या प्रकाशझोतात आल्यामुळे पीएनबीच्या शेअर्समध्ये देखील तब्बल १० टक्क्यांपर्यंत घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. तर दुसरीकडे ओएनजीसी, हीरो मोटोकॉर्प, एल अँड टी, मारूती आणि एसबीआयच्या शेअर्समध्ये घसरण झाल्याचे पहायला मिळत आहे.

देशातील अर्थव्यवस्थेला उभारी देण्याचा कोणताही मास्टर प्लान या अर्थसंकल्पात नव्हता. गुंतवणूकदारांनाही दिलासा देण्याचा अर्थसंकल्पातून कोणताही प्रयत्न करण्यात आला नाही. त्यामुळेच गुंतवणूकदार नाराज झाले असून शेअर बाजारात मोठी घसरण झाल्याचं सांगण्यात येतं.

अर्थसंकल्पानंतर २ दिवसात गुंतवणूकदारांचे शेअर बाजारात ५ लाख कोटी बुडाले