 
						Canara Bank Share Price | कॅनरा बँक या सरकारी बँकेच्या शेअर्सने मागील 3 महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांना 20 टक्क्यांपेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे. आता कॅनरा बँकेच्या शेअर्सने 2017 नंतर नवीन उच्चांक पातळी स्पर्श केली आहे. डिसेंबर 2023 या महिन्यात कॅनरा बँकेचे शेअर्स 461 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
चालू आठवड्यात सोमवार दिनांक 8 जानेवारी 2024 रोजी कॅनरा बँकेचे शेअर्स 455 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तज्ञांच्या मते पुढील काळात कॅनरा बँकेचे शेअर्स 500 रुपये किमतीवर जाऊ शकतात. शुक्रवार दिनांक 12 जानेवारी 2024 रोजी कॅनरा बँकेचे शेअर्स 1.89 टक्के वाढीसह 463.10 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेस फर्मच्या तज्ञांनी कॅनरा बँकेच्या स्टॉक खरेदीची शिफारस करताना माहिती दिली की, कॅनरा बँकेचे शेअर्स पुढील काळात अप ट्रेण्डमध्ये वाढू शकतात. कॅनरा बँकचा स्टॉक पुढील काळात 500 रुपये किंमत स्पर्श करू शकतो, असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. गुंतवणूक करताना तज्ञांनी कॅनरा बँकेच्या स्टॉकवर 440 रुपये किमतीवर स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला दिला आहे.
5 ऑक्टोबर 2023 रोजी कॅनरा बँकेचे शेअर्स 371 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 5 जानेवारी 2024 रोजी या बँकेचे शेअर्स 461 रुपये किमतीवर पोहचले होते. अवघ्या सहा महिन्यांत कॅनरा बँकेच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 46 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील एका महिन्यात या बँकेच्या शेअर्सची किंमत 4 टक्के वाढली आहे. मागील पाच ट्रेडिंग सेशनमध्ये कॅनरा बँकेचे शेअर्स 1 टक्केपेक्षा किंचित कमी वाढले आहे.
कॅनरा बँक स्टॉक टेक्निकल चार्टवर 20 DEMA च्या वर ट्रेड करत आहे. तर स्टॉकमधील मजबूतीचे आणखी एक संकेत म्हणजे, रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्सवर देखील कॅनरा बँकेचे शेअर्स सकारात्मक वाढीचे संकेत देत आहेत. स्टॉकचा दैनिक MACD मध्यवर्ती आणि सिग्नल लाईन्सच्या वर ट्रेड करत आहे. हे देखील स्टॉकमधील वाढीचे संकेत आहे. कॅनरा बँकेचा स्टॉक सर्व महत्त्वाच्या शॉर्ट आणि लाँग मूव्हिंग अॅव्हरेज जसे की 5, 10, 30, 50, 100 आणि 200 दिवसाच्या DMA वर ट्रेड करत आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		