18 May 2024 11:29 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 19 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | तज्ज्ञांकडून PSU BEL शेअरला 'BUY' रेटिंग, यापूर्वी दिला 700% परतावा, खरेदीला ऑनलाईन गर्दी Bonus Shares | पटापट मल्टिबॅगर परतावा देतोय हा शेअर, फ्री बोनस शेअर्स जाहीर, संधी सोडू नका Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, यापूर्वी 245% परतावा दिला Malavya Raj Yog | मालव्य राजयोग 'या' 5 राशींच्या लोकांना मालामाल करणार, लाभस्थानी शुक्र ठरणार वरदान Titagarh Rail Systems Share Price | तज्ज्ञांकडून स्टॉकला 'Hold' रेटिंग, अल्पावधीत देणार 22% परतावा, खरेदीला गर्दी L&T Share Price | L&T कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी, वेळीच एंट्री घ्या
x

Cyient Share Price | अल्पावधीत 155 टक्के परतावा देणाऱ्या IT शेअर कंपनीचा शेअर तेजीत, नेमकं कारण काय?

Cyient Share Price

Cyient Share Price | साएंट लिमिटेड या आयटी कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणुकदार मोठ्या प्रमाणात खरेदी करत आहेत. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये साएंट लिमिटेड कंपनीचा स्टॉक 7 टक्के वाढीसह 2297.85 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. आज देखील या कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळाली आहे.

सध्या या आयटी कंपनीचे शेअर्स आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीजवळ ट्रेड करत आहेत. साएंट लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, या आयटी कंपनीने एका दिग्गज जपानी कंपनीसोबत एमओयू केला आहे. आज सोमवार दिनांक 15 जानेवारी 2024 रोजी साएंट लिमिटेड कंपनीचे शेअर्स 1.04 टक्के वाढीसह 2,299 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

नुकताच साएंट लिमिटेड कंपनीने Sky Drive Inc या जपानी कंपनीसोबत सामंजस्य करार केला आहे. ही जपानी कंपनी eVTOL विमान बनवण्याचे काम करते. सेबीला दिलेल्या माहितीनुसार या दोन्ही कंपन्यांमध्ये अर्बन एअर मोबिलिटी आणि त्याच्या क्षमतांबाबत चर्चा झाली आहे.

साएंट लिमिटेड कंपनीने माहिती दिली की, यूएएम विमान मार्केट 2030 पर्यंत 24 अब्ज डॉलर्सवरून 30 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढेल. शहरी हवाई गतिशीलतेमध्ये साएंट लिमिटेड कंपनी जपानी कंपनी मिळून मोठे योगदान देऊ शकतात. या करारामुळे स्काय ड्राइव्हला जागतिक स्तरावर तसेच भारतात विस्तार करण्याची संधी मिळणार आहे.

मागील 1 वर्षांत साएंट लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 155 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांत साएंट लिमिटेड कंपनीच्या शेअर्सची किंमत 50 टक्क्यांनी वाढली आहे. जर तुम्ही एका वर्षापुर्वी साएंट लिमिटेड कंपनीचे शेअर्स खरेदी केले असते, आणि होल्ड करून ठेवले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 155 टक्के वाढले असते. साएंट लिमिटेड कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 2457 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 827.65 रुपये होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 2520555 कोटी रुपये आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Cyient Share Price NSE Live 15 January 2024.

हॅशटॅग्स

#Cyient Share Price(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x