
Tata Motors Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा मोटर्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स अल्पावधीत आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल करू शकतात. शेअर बाजारातील अनेक तज्ञ या कंपनीच्या शेअर्समधील वाढीबाबत सकारात्मक आहेत. तज्ञांनी टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ज्ञांच्या मते, अल्पावधीत टाटा मोटर्स स्टॉक 870 रुपये किंमत स्पर्श करेल.
मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेड फर्मच्या तज्ञांच्या मते, टाटा मोटर्स स्टॉकचा चार्ट स्ट्रक्चर मजबूत दिसत आहे. म्हणून तज्ञांनी या स्टॉकवर 777 रुपये किमतीचा स्टॉप लॉस लावून 870 रुपये टारगेट प्राइससाठी ट्रेड करण्याचा सल्ला दिला आहे. आज मंगळवार दिनांक 16 जानेवारी 2024 रोजी टाटा मोटर्स स्टॉक 0.64 टक्के वाढीसह 817.65 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.
तज्ञांच्या मते, मागील 6 महिन्यांपासून टाटा मोटर्स कंपनीचा स्टॉक आपल्या मासिक स्केलवर हायर लोअर फॉर्मेशन दर्शवत आहे. तर साप्ताहिक ट्रेंडमध्ये स्टॉक त्याची हायर हाई-हायर लोअर फॉर्मेशन दर्शवत आहे. टेक्निकल चार्टचा आढावा घेतला तर तुम्हाला समजेल की, टाटा मोटर्स कंपनीच्या स्टॉकचा RSI सध्या सकारात्मक आहे. सध्या या स्टॉकचा RSI 77.1 अंकावर स्थिर आहे. तर दुसरीकडे, टाटा मोटर्स स्टॉक आपल्या शॉर्ट-टर्म मूव्हिंग अॅव्हरेजच्या वर ट्रेड करत आहे.
12 जानेवारी 2023 रोजी टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स 412 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 12 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 817 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील एका वर्षात टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 98 टक्के अधिक परतावा कमावून दिला आहे. मागील एका आठवड्यात टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स तीन टक्क्यांनी वाढले होते. मागील एका महिन्यात टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 14 टक्के परतावा कमावून दिला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.