18 May 2024 10:27 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 19 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | तज्ज्ञांकडून PSU BEL शेअरला 'BUY' रेटिंग, यापूर्वी दिला 700% परतावा, खरेदीला ऑनलाईन गर्दी Bonus Shares | पटापट मल्टिबॅगर परतावा देतोय हा शेअर, फ्री बोनस शेअर्स जाहीर, संधी सोडू नका Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, यापूर्वी 245% परतावा दिला Malavya Raj Yog | मालव्य राजयोग 'या' 5 राशींच्या लोकांना मालामाल करणार, लाभस्थानी शुक्र ठरणार वरदान Titagarh Rail Systems Share Price | तज्ज्ञांकडून स्टॉकला 'Hold' रेटिंग, अल्पावधीत देणार 22% परतावा, खरेदीला गर्दी L&T Share Price | L&T कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी, वेळीच एंट्री घ्या
x

IRFC Share Price | IRFC शेअर्सचा धुमाकूळ, कंपनीचे बाजार भांडवल 2 लाख कोटीच्या पार, आजही 10% वाढला

IRFC Share Price

IRFC Share Price | आयआरएफसी म्हणजेच इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये बंपर तेजी पाहायला मिळत आहे. मागील काही दिवसांपासून रेल्वे कंपन्यांच्या शेअर्समध्ये सुसाट तेजी पाहायला मिळत आहे. याचा फायदा इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन आणि आरव्हीएनएल यासारख्या कंपन्यांना होत आहे.

नुकताच आयआरएफसी कंपनीने 2 लाख कोटी रुपये बाजार भांडवलाचा टप्पा पार केला आहे. त्यामुळे या कंपनीच्या शेअर मध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी ऑर्डर प्लेस होत आहेत. आज शनिवार दिनांक 20 जानेवारी 2024 रोजी शेअर बाजाराच्या विशेष ट्रेडिंग सेशनमध्ये आयआरएफसी स्टॉक 9.98 टक्के वाढीसह 176.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आयआरएफसी कंपनीचे शेअर्स 10 टक्क्यांच्या वाढीसह 149.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र काही तासात हा स्टॉक 160.80 रुपये किमतीवर पोहचला. आज या कंपनीचे शेअर्स आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत आहे. सध्या आयआरएफसी कंपनीचे बाजार भांडवल 2.09 लाख कोटी रुपयेवर पोहचले आहे. मागील 10 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 495 टक्के परतावा कमावून दिला आहे.

एप्रिल 2023 मध्ये आयआरएफसी कंपनीचे शेअर्स 26 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आता हा स्टॉक 170 रुपयेच्या पार गेला आहे. मागील वर्षी सप्टेंबर 2023 मध्ये आयआरएफसी कंपनीच्या शेअर्सने 1 लाख कोटी रुपये बाजार भांडवलाचा टप्पा पार केला होता. तर अवघ्या 4 महिन्यांत आयआरएफसी कंपनीचे बाजार भांडवल 2 लाख कोटी रुपयेवर पोहचले आहेत.

मागील एका महिन्यात आयआरएफसी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 57 टक्के परतावा कमावून दिला आहे. आयआरएफसी या सरकारी रेल्वे कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, भारत सरकारने रेल्वेच्या पायाभूत सुविधांवर आपले लक्ष केंद्रित केले आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IRFC Share Price NSE Live 20 January 2024.

हॅशटॅग्स

IRFC Share Price(40)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x