 
						Tiger Logistics Share Price | शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टायगर लॉजिस्टिक इंडिया कंपनीचे शेअर्स मजबूत वाढीसह ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअर्सने शुक्रवारी 812.65 रुपये किंमत स्पर्श केली होती. मात्र टायगर लॉजिस्टिक इंडिया कंपनीच्या शेअर्सने आपली 52 आठवड्यांची नवीन उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली आहे. शनिवारी देखील या कंपनीचे शेअर्स मोठ्या प्रमाणात खरेदी केले जात आहेत.
टायगर लॉजिस्टिक इंडिया कंपनीचे एकूण बाजार भांडवल 840 कोटी रुपयेवर गेले आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 335 रुपये होती. आज शनिवार दिनांक 20 जानेवारी 2024 रोजी टायगर लॉजिस्टिक इंडिया स्टॉक 6.89 टक्के वाढीसह 848.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
टायगर लॉजिस्टिक कंपनीचे शेअर्स मागील काही दिवसांपासून विक्रीच्या दबावात ट्रेड करत होते. मागील 5 दिवसात शेअर्समध्ये 7 टक्के घसरण झाली होती. मागील एका महिन्यात टायगर लॉजिस्टिक्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 30 टक्के नफा मिळवून दिला होता.
मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 101 टक्के वाढली होती. याकाळात शेअर्सची किंमत 393 रुपयेवरून वाढून 792 रुपये किमतीवर पोहचली होती. कोरोना काळात 27 मार्च 2020 रोजी टायगर लॉजिस्टिक कंपनीचे शेअर्स 30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील चार वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 2900 टक्के नफा कमावून दिला आहे.
टायगर लॉजिस्टिक्स कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय लॉजिस्टिक्स क्षेत्रात व्यवसाय विस्तार करण्यासाठी टायगर लॉजिस्टिक इंडिया कंपनीने बांगलादेशच्या सिकंदर ग्रुपच्या पॉवर पॅक होल्डिंग्स लिमिटेड कंपनीसोबत सामंजस्य करार संपन्न केला आहे. टायगर लॉजिस्टिक्स इंडिया आणि सिकंदर ग्रुप एकत्रितपणे संयुक्त उपक्रम स्थापन करून जागतिक मार्केटमध्ये आपल्या व्यापार विस्तार करणार आहे.
टायगर लॉजिस्टिक्स कंपनीने भारत आणि बांगलादेश यांच्यातील आंतरराष्ट्रीय लॉजिस्टिकमधील शक्यतांचा फायदा घेण्यासाठी हा नवीन करार केला आहे. सिकंदर ग्रुप ही बांगलादेशमधील एक आघाडीची लॉजिस्टिक सेवा प्रदान करणारी कंपनी म्हणून प्रसिद्ध आहे. ही कंपनी मुख्यतः बँकिंग, विमा, आरोग्य सेवा, रेस्टॉरंट्स, हॉटेल्स, आंतरराष्ट्रीय व्यापार, वीज निर्मिती, पायाभूत विकास या क्षेत्रात व्यवसाय करते.
टायगर लॉजिस्टिक्स कंपनी BHEL या सरकारी कंपनीसाठी कस्टम क्लिअरन्स, फॉरवर्डिंग, हाताळणी, वाहतूक आणि गोदाम सेवा प्रदान करण्याचे काम हाताळणार आहे. टायगर लॉजिस्टिक्स कंपनीने हिंदुस्तान पेट्रोलियम, बँक नोट पेपर मिल, हिंदुस्तान इन्सेक्टिसाइड्स लिमिटेड, एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, भारत अर्थ मूव्हर लिमिटेड, नॅशनल ऑटोमोटिव्ह टेस्टिंग आणि आर अँड डी इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट, इंडियन ऑइल, चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्स आणि नॅशनल इंटरनॅशनल इंडस्ट्रीज सोबत देखील व्यापारी भागीदारी करार केला आहे. यासह टायगर लॉजिस्टिक इंडिया कंपनीला एएफ सोलर एनर्जी कंपनीने एक मोठी ऑर्डर देखील दिली आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		