16 May 2024 8:28 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Andhra Paper Share Price | स्टॉक स्प्लिट आणि आणि डिव्हीडंड वाटपाची घोषणा, अल्पावधीत मजबूत फायदा करून घ्या Praj Industries Share Price | अशी संधी सोडू नका! फटाफट 50% परतावा मिळेल, तज्ज्ञांचा स्टॉक खरेदीचा सल्ला Triveni Turbine Share Price | 97 रुपयाच्या शेअरची कमाल! 3 वर्षात 470% परतावा दिला, शेअर अप्पर सर्किट हिट करतोय RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रेल्वे स्टॉक बुलेट ट्रेनच्या वेगाने परतावा देणार HAL Share Price | PSU स्टॉक HAL सुसाट तेजीत परतावा देणार, परतावा पाहून खरेदीला ऑनलाईन गर्दी Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 16 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Power Share Price | तज्ज्ञांकडून टाटा पॉवर शेअर्ससाठी 'बाय' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस केली जाहीर
x

LIC Share Price | LIC शेअर्समध्ये मजबूत तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून शेअरची पुढची टार्गेट प्राईस जाहीर, किती फायदा होणार?

LIC Share Price

LIC Share Price | एलआयसी कंपनीचा IPO जेव्हा गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता, तेव्हा कंपनीने आपल्या शेअर्सची किंमत बँड 902 रुपये ते 949 रुपये निश्चित केली होती. आणि एलआयसी स्टॉक गुंतवणुकदारांना 949 रुपये या अप्पर किंमत बँडवर वाटप करण्यात आले होते. मात्र एलआयसी कंपनीचे शेअर्स आपल्या IPO किंमत बँडच्या तुलनेत खाली सूचीबद्ध झाले होते. तेव्हापासून आजपर्यंत या कंपनीच्या शेअर्सने आपली आयपीओ किंमत पार केली नाहीये.

एलआयसी कंपनीचे एकूण बाजार भांडवल 5,92,019.78 कोटी रुपये आहे. एलआयसी कंपनी SBI बँकेला मागे टाकून बाजार भांडवलाच्या बाबतीत भारतातील सर्वात मौल्यवान सरकारी कंपनी ठरली आहे. आज मंगळवार दिनांक 23 जानेवारी 2024 रोजी एलआयसी स्टॉक 2.56 टक्के घसरणीसह 912.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

एलआयसी कंपनीचे शेअर्स 17 मे 2022 रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध झाले होते. त्या दिवशी एलआयसी स्टॉक बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजवर 867.20 रुपये आणि NSE इंडेक्सवर 872 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाला होता. आता एलआयसी कंपनीच्या शेअर्सने प्रथमच 900 रुपये किंमत पार केली आहे. शनिवारच्या विशेष ट्रेडिंग सेशनमध्ये LIC स्टॉक 4 टक्क्यांच्या वाढीसह 936.85 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. मागील एका वर्षभरात एलआयसी कंपनीच्या शेअर्सने स्पर्श केलेली नीचांक किंमत पातळी 530.05 रुपये होती.

एलआयसी कंपनीच्या शेअर्समध्ये मागील काही काळापासून सकारात्मक वाढ पाहायला मिळत आहे. मात्र ज्या लोकांनी आयपीओमध्ये गुंतवणूक केली होती, ते लोक अजूनही तोट्यात आहे. मागील एका महिन्यात एलआयसी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 23.07 टक्के परतावा कमावून दिला आहे.

मागील तीन महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 47.55 टक्के वाढली आहे. 1 जानेवारी 2024 पासून आतापर्यंत एलआयसी स्टॉक 12.53 टक्के मजबूत झाला आहे. मागील एका वर्षात एलआयसी कंपनीच्या शेअरधारकांनी 34.11 टक्के नफा कमावला आहे. कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीज फर्मच्या तज्ञांच्या मते, एलआयसी स्टॉक पुढील काळात 1,040 रुपये किंमत स्पर्श करू शकतो.

बाजार भांडवलाच्या बाबतीत भारतातील टॉप 10 कंपन्या : 

रिलायन्स : 18.35 लाख कोटी रुपये

TCS : 14.12 लाख कोटी रुपये

HDFC बँक : 11.22 लाख कोटी

ICICI बँक : 7.07 लाख कोटी रुपये

इन्फोसिस : 6.84 लाख कोटी रुपये

भारती एयरटेल : 6.31 लाख करोड़ रुपये

एलआईसी : 5.92 लाख करोड़ रुपये

आईटीसी : 5.84 लाख करोड़ रुपये

हिंदुस्तान यूनिलीवर : 5.80 लाख करोड़ रुपये

एसबीआई : 5.63 लाख करोड़ रुपये

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | LIC Share Price NSE Live 23 January 2024.

हॅशटॅग्स

#LIC Share Price(98)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x