
Tata Power Share Price | मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये भारतीय शेअर बाजारात जोरदार घसरण पाहायला मिळाली होती. अनेक दिग्गज कंपन्यांचे शेअर्स देखील लोअर सर्किटमध्ये अडकले होते. आज मात्र शेअर बाजारात कालच्या तुलनेत विपरीत परिस्थिती पाहायला मिळाली. आज शेअर बाजाराची सुरुवात किंचित विक्रीच्या दाबवासह झाली होती. मात्र काही वेळातच शेअर्स बाजार सावरला आणि सर्व कंपन्यांचे शेअर्स जोरदार तेजीत वाढू लागले. तज्ञांच्या मते, जागतिक गुंतवणूक बाजारात सकारात्मक भावना आहेत.
मिडकॅप आणि स्मॉलकॅप कंपन्याच्या शेअर्समध्ये मजबूत गुंतवणूकीच्या आणि तेजीच्या संधी आहेत. या तेजीचा फायदा घेण्यासाठी तज्ञांनी फार्मा आणि पॉवर क्षेत्रातील दिग्गज शेअर्स मध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. चला तर मग जाणून घेऊ या स्टॉकबद्दल.
टाटा पॉवर :
तज्ञांनी टाटा पॉवर स्टॉक खरेदी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी गुंतवणूक करताना या स्टॉकमध्ये 342 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते हा स्टॉक लवकरच 360 रुपये किमतीच्या पार जाऊ शकतो. नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 1 कोटी घरांवर रूफटॉप सौर प्रकल्प बसवण्याची घोषणा केली आहे.
टाटा पॉवर कंपनीला सोलर पॅनल इन्स्टॉलेशन आणि कमिशनिंगचा मजबूत फायदा होऊ शकतो. आज बुधवार दिनांक 24 जानेवारी 2024 रोजी टाटा पॉवर स्टॉक 3.38 टक्के वाढीसह 357.90 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.
सिप्ला :
सध्या शेअर बाजारात तेजी असताना गुंतवणूक करून फायदा घेण्यासाठी तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स निवडले आहेत. तज्ञांनी या स्टॉकमध्ये गुंतवणूक करताना 1288 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. हा स्टॉक पुढील काही दिवसात आधी 1430 रुपये आणि नंतर 1445 रुपये किंमत पार करू शकतो. या कंपनीने आपले डिसेंबर 2023 तिमाहीचे निकाल अपेक्षेपेक्षा चांगले दिले आहेत. आज बुधवार दिनांक 24 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.33 टक्के वाढीसह 1,413.60 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.