 
						Cupid Share Price | क्युपिड लिमिटेड या स्मॉलकॅप कंपनीने आपल्या पात्र गुंतवणूकदारांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. क्यूपिड लिमिटेड कंपनी आपल्या विद्यमान पात्र गुंतवणूकदारांना 1:1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करणार आहे. म्हणजेच कंपनी शेअरधारकांना प्रत्येक शेअरवर 1 बोनस शेअर मोफत देणार आहे. याशिवाय क्युपिड लिमिटेड कंपनी आपले शेअर्स 1:10 या प्रमाणात विभाजित करणार आहे.
क्यूपिड लिमिटेड कंपनी आपले 10 रुपये दर्शनी मूल्य असलेले शेअर्स 1 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या दहा शेअर्समध्ये विभाजित करणार आहे. आज गुरूवार दिनांक 25 जानेवारी 2024 रोजी क्युपिड लिमिटेड कंपनीचे शेअर्स 2.13 टक्के घसरणीसह 1,776.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
क्युपिड लिमिटेड ही कंपनी मुख्यतः पुरुष आणि महिलांसाठी कंडोम, ल्यूब्रिकेंट आणि IVD किट्स बनवण्याचा व्यवसाय करते. मागील काही वर्षांत क्युपिड लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने शानदार कामगिरी केली आहे. 25 एप्रिल 2014 रोजी क्युपिड लिमिटेड कंपनीचे शेअर्स 8.80 रुपये किमतीच्या आसपास ट्रेड करत होते. तर 24 जानेवारी 2024 रोजी क्युपिड लिमिटेड कंपनीचे शेअर्स 1865.95 रुपये किमतीवर पोहचले होते. या 10 वर्षांत क्युपिड लिमिटेड कंपनीने आपल्या गुंतवणुकदारांना 22239 टक्क्यांपेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे.
मागील 20 वर्षात क्युपिड लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 31900 टक्क्यापेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. या काळात कंपनीचे शेअर्स शेअर्स 5.83 रुपये किमतीवरून वाढून 1865.95 रुपये किमतीवर पोहचले आहेत. मागील एका वर्षात क्युपिड लिमिटेड कंपनीच्या शेअर्सची किंमत 610 टक्क्यांनी मजबूत झाली आहे. 24 जानेवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर 262.50 रुपयये किमतीवर ट्रेड करत होते.
मागील 6 महिन्यांत क्यूपिड लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 517 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. या काळात क्युपिड लिमिटेड कंपनीचे शेअर्स 301.50 रुपये किमतीवरून वाढून 1865.95 रुपये किमतीवर पोहचले आहेत. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 2034.45 रुपये होती. तर नीचांकी किंमत पातळी 235.30 रुपये होती.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		