
Yes Bank Share Price | येस बँकेच्या शेअरबाबत मोठी बातमी येत आहे. या बातमीमुळे बँकेच्या शेअरमध्ये तेजी आली आहे. गुरुवारी बीएसईवर कंपनीचा शेअर 0.81 टक्क्यांनी वधारून 24.88 रुपयांवर बंद झाला. येस बँकेच्या शेअरमध्ये गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने वाढ दिसून येत आहे.
काय आहे ती बातमी?
कंपनीचे तिमाही निकाल 27 जानेवारी 2024 रोजी जाहीर होणार आहेत. या दिवशी डिसेंबर तिमाहीतसेच चालू आर्थिक वर्षातील 9 महिन्यांचे निकाल जाहीर होतील, असे कंपनीने म्हटले आहे. मात्र, या दिवशी बाजार बंद राहणार आहे. अशा तऱ्हेने बँकेच्या तिमाही निकालाचा परिणाम सोमवारी शेअर्समध्ये दिसू शकतो.
3 महिन्यात 85 टक्के परतावा
येस बँकेचा शेअर 52 आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवर 26.25 रुपये (16 जानेवारी 2024) आहे. गेल्या 3 महिन्यांत बँकेच्या शेअर्सच्या किंमतीत 85 टक्क्यांची वाढ झाली आहे. शुक्रवारी बँकेचे मार्केट कॅप 71,558.80 कोटी रुपये होते.
ब्रोकरेज कंपन्यांना काय वाटते?
ब्रोकरेज कंपन्यांना येस बँकेच्या कामगिरीबद्दल खूप विश्वास आहे. बिझनेस टुडेच्या रिपोर्टनुसार, डिसेंबर तिमाहीत येस बँकेचे निकाल उत्तम राहतील, असे ब्रोकरेज कंपन्यांचे मत आहे. निव्वळ नफ्यात वाढ होऊ शकते. ज्यामुळे नेट इंटरेस्ट इनकममध्ये (एनआयआय) तेजी पाहायला मिळू शकते. एनआयआयमध्ये वार्षिक ६ टक्के वाढ होईल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. रिटेल आणि एमएसएमई सेगमेंटमध्येही तेजी दिसू शकते.
शेअर्समध्ये 1 महिन्यात 18 टक्के वाढ
गेल्या महिन्याभरात येस बँकेच्या शेअरमध्ये 18 टक्क्यांची वाढ झाली आहे. येस बँकेचा 52 आठवड्यांचा नीचांकी स्तर 14.10 रुपये प्रति शेअर आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.