
Gujarat Ambuja Exports Share Price | गुजरात अंबुजा एक्सपोर्ट्स या स्मॉलकॅप कंपनीच्या शेअर्सने मागील काही वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त नफा कमावून दिला आहे. या स्मॉलकॅप कंपनीचे शेअर्स 2 रुपये किमतीवरून वाढून 378 रुपये किमतीवर पोहोचले आहेत. या काळात गुजरात अंबुजा एक्सपोर्ट्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 16000 टक्केपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे.
कृषी प्रक्रिया क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या गुजरात अंबुजा एक्सपोर्ट्स कंपनीने आपल्या शेअरधारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. गुजरात अंबुजा एक्सपोर्ट्स कंपनी प्रथमच मोफत बोनस शेअर्स वाटप करणार आहे. गुरूवार दिनांक 25 जानेवारी 2024 रोजी गुजरात अंबुजा एक्सपोर्ट्स स्टॉक 12.85 टक्के वाढीसह 378 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.
गुजरात अंबुजा एक्सपोर्ट्स कंपनीने स्टॉक एक्सचेंज फाइलिंगमध्ये माहिती दिली आहे की, कंपनीच्या संचालक मंडळाने 12 फेब्रुवारी 2024 रोजी बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत कंपनीचे संचालक गुंतवणुकदारांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याबाबत निर्णय घेणार आहे. गुजरात अंबुजा एक्सपोर्ट्स कंपनीने आपले 2 रुपये दर्शनी मूल्य असलेले शेअर्स 1 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या शेअर्समध्ये विभाजीत केले होते. आता ही कंपनी आपल्या गुंतवणुकदारांना पहिल्यांदाच मोफत बोनस शेअर्स वाटप करणार आहे.
23 जानेवारी 2004 रोजी गुजरात अंबुजा एक्सपोर्ट्स कंपनीचे शेअर्स 2.19 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 25 जानेवारी 2024 रोजी कंपनीचे शेअर्स 10 टक्क्यांच्या वाढीसह 368.25 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या काळात गुजरात अंबुजा एक्सपोर्ट्स कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणुकदारांना 16715 टक्के परतावा कमावून दिला आहे.
मागील 10 वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 2690 टक्के नफा कमावून दिला होता. 24 जानेवारी 2014 रोजी गुजरात अंबुजा एक्सपोर्ट कंपनीचे शेअर्स 13.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 410.05 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 224.20 रुपये होती.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.