 
						Adani Enterprises Share Price | सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अमेरिकन ब्रोकरेज फर्म कॅन्टोर फिट्झगेराल्डने आपला एक अहवाल प्रसिद्ध असून अदानी ग्रुपचा भाग असलेल्या अदानी एंटरप्रायझेस कंपनीच्या शेअर्सचे विश्लेषण केले होते. आणि त्यांनी पुढील 12 महिन्यांत या स्टॉकमध्ये 50 टक्के वाढीचा अंदाज व्यक्त केला होता.
ब्रोकरेज फर्मने आपल्या अहवालात म्हंटले आहे की, पुढील 5 वर्षांत अदानी एंटरप्रायझेस कंपनी आपल्या विमानतळ व्यवसायाचे विलगीकरण करणार आहे. त्यामुळे कंपनीच्या शेअरधारकांना व्हॅल्यू अनलॉकिंगचा लाभ घेता येईल. आज बुधवार दिनांक 31 जानेवारी 2024 रोजी अदानी एंटरप्रायझेस कंपनीचे शेअर्स 1.52 टक्के वाढीसह 3,138 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
मीडिया मुलाखतीत कॅन्टोर फिट्झगेराल्ड फर्मच्या तज्ञांनी माहिती दिली की, अदानी एंटरप्रायझेस ही भारतातील पहिली कंपनी आहे, जिचे विश्लेषण करण्यासाठी तज्ञांनी सखोल संशोधन केले आहे. ब्रोकरेज फर्मने या कंपनीच्या स्टॉकवर ओव्हरवेट रेटिंगसह प्रति शेअर 4368 रुपये टार्गेट प्राइस निश्चित केली आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अदानी एंटरप्रायझेस कंपनीचे शेअर्स 6 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. आता या कंपनीच्या शेअरने हिंडेनबर्ग अहवालापूर्वीची किंमत पातळी पुन्हा एकदा प्राप्त केली आहे.
कॅन्टोर फिट्झगेराल्ड फर्मने म्हंटले आहे की, भारत आपल्या पायाभूत सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आणि विकास करत आहे. याचा सर्वाधिक फायदा घेण्याची संधी अदानी समूहाला मिळणार आहे. पुढील 5 वर्षांत अदानी समूहाचा विमानतळ व्यवसाय सर्वोत्तम कामगिरी करणारा विभाग ठरेल, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.
कॅन्टोर फिट्झगेराल्ड फर्मने अदानी समुहाच्या विमानतळ व्यवसायासाठी प्रति शेअर 1622 रुपये मूल्य निश्चित केले आहे. तज्ञांनी ग्रीन हायड्रोजन बाबत देखील सकारात्मक भावना व्यक्त केल्या आहेत. मात्र अदानी एंटरप्रायझेस कंपनी सध्या ग्रीन हायड्रोजनमधील संधीचा लाभ घेऊ शकत नाही.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		