10 May 2024 8:26 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 10 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 10 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, 1 वर्षात दिला 290% परतावा, कंपनीबाबत आली मोठी अपडेट Spright Agro Share Price | 65 पैशाच्या शेअरची कमाल! अवघ्या 1 वर्षात 5000% परतावा दिला, खरेदीला आजही स्वस्त Gold Rate Today | गुड-न्यूज! आज अक्षय्य तृतीयेच्या 1 दिवस आधी सोन्याचा भाव धडाम, पटापट नवे दर तपासून घ्या Wipro Share Price | विप्रो शेअर पुढे तेजीत येणार, कंपनीबाबत सकारात्मक बातमीने गुंतवणूकदारांना फायदा होणार MRPL Share Price | मल्टिबॅगर MRPL शेअर 24 टक्क्याने घसरणार? स्टॉकचार्टने दिले संकेत, तज्ज्ञांनी काय म्हटलं?
x

Avanti Feeds Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर! तब्बल 33673% परतावा दिला, सकारात्मक अपडेटमुळे शेअर पुन्हा तेजीत

Avanti Feeds Share Price

Avanti Feeds Share Price | अवंती फीड्स लिमिटेड, एपेक्स फ्रोझन फूड्स लिमिटेड आणि झील एक्वा या तिन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुरुवारी 10 टक्क्यांचा अप्पर सर्किट लागला होता. आज देखील या कंपन्यांचे शेअर्स मोठ्या प्रमाणात खरेदी केले गेले आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अर्थसंकल्पीय भाषणानंतर हे तिन्ही स्टॉक तेजीत आले होते. Avanti Feeds Share

अर्थमंत्री यांनी 2014 पासून सीफूड निर्यात दुप्पट वाढल्याची माहिती अर्थसंकल्पीय भाषणात जाहीर केली होती. आणि पंतप्रधान मत्स्य योजनेमुळे अंतर्देशीय जलसंवर्धनाला अधिक चालना मिळाल्याची माहिती दिली. त्यामुळे झील ॲक्वा लिमिटेड कंपनीचे शेअर्स काल 10 टक्के वाढीसह आणि अवंती फीड्स कंपनीचे शेअर्स 9 टक्के वाढीसह ट्रेड करत होते.

गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अवंती फीड्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 9.39 टक्के वाढीसह 570.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 2 फेब्रुवारी 2024 रोजी अवंती फीड्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 1.29 टक्के वाढीसह 550.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. तर एपेक्स फ्रोझन फूड्स कंपनीचे शेअर्स 1.34 टक्के वाढीसह 275.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. आणि झील एक्वा कंपनीचे शेअर्स 9.93 टक्के वाढीसह 13.61 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

मागील एका महिन्यात अवंती फीड्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 27 टक्के परतावा कमावून दिला आहे. एपेक्स फ्रोझन फूड्स कंपनीचे शेअर्स गुरुवारी 7.5 टक्के वाढीसह 272.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आणि Zeal Aqua Limited कंपनीचे शेअर 10 टक्के वाढीसह 12.38 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

देशांतर्गत मत्स्यपालन उत्पादनात दुप्पट वाढ झाली असून सीफूड निर्यात देखील दुप्पट झाली आहे. यासह सरकारने अंतरिम अर्थसंकल्पात देशात 5 इंटिग्रेटेड ॲक्वापार्क उभारण्याची घोषणा केली आहे. पुढील काळात भारताची सीफूड निर्यात वाढून 1 लाख कोटी रुपयेच्या पार जाण्याचा अंदाज आहे. याशिवाय, पीएम मत्स्य योजना सी फूड व्यवसायाला आणखी चालना देईल आणि देशात 55 लाख रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Avanti Feeds Share Price NSE Live 02 February 2024.

हॅशटॅग्स

Avanti Feeds Share Price(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x